×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक

Pune Crime | पत्नीचा छळ करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी 5 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) कार्यरत असणाऱ्या 35 वर्षीय पोलीस शिपायाचा समावेश असून आरोपी पोलीस पतीला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपींविरुद्ध आयपीसी 498 (अ), 406, 323,504, 34 नुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत 26 वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती (Husband), सासू (Mother-in-Law), सासरे (Father-in-Law) , दिर, जाऊ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन 35 वर्षाच्या पतीला अटक केली आहे. हा प्रकार 17 एप्रिल 2016 ते 22 फेब्रुवारी 2022 या कालावधीत उरुळी देवाची येथे घडला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती कोंढवा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आरोपींनी लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणावरुन महिलेचा शारिरीक व मानसिक छळ केला. सासरच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.9) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Policeman arrested for harassing wife domestic violence act loni kalbhor kondhwa police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News