Pune Crime | फ्लॅट बुकींग रद्द करण्यासाठी दबाव ! ओरिएन्ट प्रमोटर्स, जेनसीन प्रॉपर्टीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर, पॅसिफिक ओरियंटच्या भागीदार व प्रमोटर्सवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बुक केलेल्या फ्लॅटची बुकींग रद्द (Flat Booking Cancel) करुन फसवणूक (Cheating Case) केली. तसेच दुसऱ्या फ्लॅटची बुकींग रद्द करण्यासाठी दबाव टाकला. आरोपींनी खरेदी खतामधील अटी व शर्तीं (Terms and Conditions) तसेच महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायद्याचे (Maharashtra Flat Ownership Act) उल्लंघन केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) 7 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे. पोलिसांनी (Pune Police) इकबाल मोटागमवाला (Iqbal Motagamwala), समिर खान (Samir Khan,), परवेज गौस खान (Parvez Gaus Khan), ओरीएन्ट प्रमोटर्स (Orient Promoters), जेनसीन प्रॉपर्टीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर (Jensen Properties & Infrastructure), पॅसिफिक ओरीयंट जेनसिस असोसीएट्स चे भागीदार व प्रमोटर्स (Pacific Orient Genesis Associates Partners Promoters), साबा समिर शेख (Saba Samir Sheikh) यांच्याविरुद्ध 406, 420, 506,34, महा. फ्लॅट ओनरशिप कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत 56 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2010 ते जानेवारी 2022 या कालावधीत महंमदवाडी हडपसर येथील इनग्रेशिया (Ingresia Mahammadwadi Hadapsar) येथे घडला आहे. फिर्यादी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन कोंढवा पोलिसांनी शनिवारी (दि.9) 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यांनी इनग्रेशिया गृह प्रकल्पात फ्लॅट बुक केला होता.
15 फेब्रुवारी 2012 रोजी आरोपींनी फ्लॅटचे खरेदी खत करुन दिले होते. आरोपींनी खरेदी खतामधील अटी व शर्तींचा भंग केला.
तसेच रेरा कायद्याचे (Rera Act) उल्लंघन करुन बुक केलेल्या फ्लॅटचे बुकींग फिर्यादी यांची परवानगी न घेता रद्द करुन फसवणूक केली.
तसेच ठरलेल्या किमती पेक्षा 8 लाख 33 हजार 688 हजार रुपयांची कोऱ्या कागदावर मागणी केली.

यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना लेटर हेडवर सही, शिक्का मारुन रक्कमेची मागणी केल्याचे लिहून देण्यास सांगितले.
मात्र आरोपींनी तसे करुन देण्यास नकार दिला.
तसेच ईमेल करण्यास नकार दिला. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी फ्लॅटची बुकींग रद्द करण्यासाठी दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादी यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pressure to cancel flat booking FIR against Orient Promoters Jensen Properties and Infrastructure Pacific Orient Partners and Promoters in kondhwa police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा