Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नांदेडहून (Nanded) सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या कामगाराला अ‍ॅन्टी करप्शन (Anti Corruption) अशी बतावणी करुन चौघा जणांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. (Pune Crime)

 

ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील (Vega Center Swargate) ट्रॅव्हल थांब्याजवळ फुटपाथवर ७ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.

 

याबाबत मधुरम सत्यनारायण सोनी Madhuram Satyanarayan Soni (वय २७, रा. गंगा सिटी, नांदेड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याकडील कर्मचारी शंकर भालेराव हे त्यांच्या सांगण्यावरुन सोने खरेदी करण्यासाठी नांदेडहून पुण्याला (Nanded To Pune) प्रवास करुन आले होते.
ट्रॅव्हल बसमधून ते स्वारगेटला आले होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून चौघे जण आले.
त्यांच्यातील एकाने शंकर यांच्या खाद्यावर हात टाकून “अ‍ॅन्टी करप्शन” अशी बतावणी करुन त्यांना पिस्टलसारख्या हत्याराचा धाक दाखवला (Pune Crime).
त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील १७ लाख ५८ हजार ७५० रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले.
ही बाब शंकर यांनी सोनी यांना कळविली.
त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ (API Rasal) तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हयातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Pune Crime | Pretending to be anti corruption robbed a bullion worker of Rs 17 lakh Incident near Vega Center in Swargate

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा