Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन दोघा चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला लुटले; पुण्यातील पाषाण परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फिरायला बाहेर गेलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पोलीस असल्याची बतावणी करीत दोघा चोरट्याने महिलेच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन (Pune Crime) नेले.

 

याप्रकरणी पाषाण (Pashan) येथील एका ७२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (chaturshringi police station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सूस रोडवरील (Sus Road) वरदाहिनी सोसायटीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. फिर्यादी हे आपल्या पत्नीसह फिरायला गेले होते. त्यावेळी दोघे जण त्यांच्याजवळ आले व त्यांनी हिंदीमध्ये पोलीस असल्याची बतावणी केली. या ठिकाणी एका सिनिअर सिटीझनचे (senior citizen) सोने लुटले आहे. आम्ही तुम्हाला सतर्क करतोय, असे सांगून विश्वासात घेतले. त्यांना अंगावरचे दागिने पिशवीत ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांच्या पत्नीने अंगावर २ लाख ६० हजार रुपयांचे ११० ग्रॅम वजनाचे दागिने काढून पिशवीत ठेवले. फिर्यादी यांनी ती पिशवी आरोपीकडे दिल्यावर ते दोघे दागिने असलेली पिशवी घेऊन मोटारसायकल वरुन पळून (Pune Crime) गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pretending to be police, two thieves robbed the senior citizen couple; Incidents in the pashan area of ​​ chaturshringi police station of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे-सोलापूर रोडवर प्रवाशांनी कॅबचालकाला धमकावून गाडी नेली चोरुन; चाकूचा धाक दाखवून चालकाला लुबाडले

Omicron Covid Variant | पुण्यात परदेशातून आलेल्या व्यक्तीचा NIV कडून रिपोर्ट आला, ओमिक्रॉन नाही तर आढळला कोरोनाचा ‘हा’ व्हेरिएंट

Thane Crime | धक्कादायक ! 45 वर्षाच्या महिलेवर जीव जडला म्हणून केलं तिच्या पोरीशी लग्न; नंतर 27 वर्षांच्या जावयाकडून सासूवर बलात्कार