Pune Crime | व्याजासहीत पैसे परत दिल्यानंतर अडीच लाखाची मागणी, खासगी सावकार भरत बाबूलालजी उणेचा याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खासगी सावकाराकडून (Private Lender) व्याजाने घेतलेले पैसे 10 टक्के व्याजासहीत (Interest) परत करुनही व्यावसायिकाकडे (Businessman) अडीच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या खाजगी सावकाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली. भरत बाबूलालजी उणेचा (Bharat Babulalji Unecha) असे अटक करण्यात आलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार (Maharashtra Lenders Act), दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

याबाबत बाळू पन्नालाल उणेचा Balu Pannalal Unecha (वय – 38) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युनिट दोनच्या पोलिसांनी भरत उणेचा (वय – 36 रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी – Bibwewadi) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यावसायिक कामासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी खासगी सावकार भरत उणेचा याच्याशी संपर्क साधला. भरत उणेचा याने फिर्यादी यांना मासिक 10 टक्के व्याजदराने तीन लाख रुपये दिले. (Pune Crime)

आरोपीने पैसे देताना फिर्यादी यांच्याकडून सही केलेले धनादेश (Check), कोरे स्टॅम्प (Blank Stamp) व इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली. तसेच त्यांच्यातील व्यवहाराबाबत कोऱ्या स्टॅम्पवर लिहून घेतले. दरम्यान फिर्यादी यांनी घेतलेले पैसे व्याजासह परत केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्याकडे आणखी अडीच लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाहीतर समाजात बदनामी करण्याची धमकी (Threats) दिली.

 

आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यानी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे तक्रार केली.
चौकशीमध्ये भरत उणेचा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), राजेंद्र पाटोळे (Rajendra Patole), पोलीस कर्मचारी संजय जाधव, मोहसीन शेख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने उणेचा याला सापळा रचून अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | Private Lender Bharat Babulalji Unecha Arrested By Pune Police Crime Branch

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा