Pune Crime | बारामतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एजंट महिला गजाआड

पुणे / बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) बारामती शहरात (Baramati) असलेल्या गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात सुरु असलेल्या वेश्या (prostitution) व्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. बारामती पोलिसांनी (Baramati police) या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन एका एजंट महिलेला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. याबाबत नागरिकांनी बारामती पोलिसांकडे तक्रार केली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश मार्केट (Ganesh Market) भाजी मंडई, गुणवडी चौक परिसरात या महिला व्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (Police Inspector Sunil Mahadik) यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री सापळा रचण्यात आला. गणेश मार्केट जवळील एका सराफाच्या दुकानासमोर थांबून तीन महिला वेश्या व्यवसाय करत होत्या.

 

पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे पाचशे रुपये देऊन त्याला महिलांकडे पाठवले. त्याने तेथे उभ्या असलेल्या महिलेकडे जात तिला पैसे दिल्यानंतर साध्या वेशातील पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच त्याठिकाणी छापा (Pune Crime) टाकून एका महिलेला ताब्यात घेतले. ती मुळची जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आहे. तिच्यासोबत बारामतीतील आणखी एक महिला आढळून आली. तिनेही कसब्यातील लेंडीपट्टा येथे राणाऱ्या एजंट महिला कमिशनपोटी हा व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले.

 

 

बारामती पोलिसांनी दोन महिलांची सुटका (police release two women) करत एजंट महिलेला अटक केली.
तिच्याकडून मोबाईल व रोख रक्कम जप्त केली. तिच्याविरोधात अनैतिक
मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार (anti human trafficking ) गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Crime) आहे.
दोन महिलांकडून ती या ठिकाणी वेश्या व्यवसाय करुन घेत होती. या दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील (PSI Ganesh Patil),
युवराज घोडके (PSI Yuvraj Ghodke), सहायक फौजदार संजय जगदाळे, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे,
दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, सचिन कोकणे, दशरथ इंगोले, मनोज पवार, संध्या कांबळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | prostitution racket baramati police release two women pune rural police marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा