Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरामध्ये टुरिस्ट गाडीतून (Tourist Car) वेश्या व्यवसायासाठी (Prostitution) मुली पुरवणाऱ्या परप्रांतीय टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Cell, Pune) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून मुख्य सुत्रधारासह दलालला अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही कारवाई विमाननगर येथील ईस्ट फील्ड या हॉटेलमध्ये (East Field Hotel Viman Nagar) करण्यात आली. आरोपी टुरिस्ट गाडी असल्याचा बहाणा करुन मुली (Pune Crime) पुरवत होते.

 

कुलदिप प्रसाद मोहनप्रसाद महतो Kuldip Prasad Mohan Prasad Mahato (वय – 26 रा. जी. बी. डोंगरीपाडा, बुद्ध विहाराजवळ, ठाणे, मुळ रा. चोपारण, ता इटकोरी, जि. हजारीबाग, झारखंड – Jharkhand), जयशंकर प्रसाद रमेश साव Jaishankar Prasad Ramesh Saw (वय – 20 रा. छोटा धोबीघाट, जे. आर. बोरीया मार्ग, महालक्ष्मी इस्ट, सात रस्ता जकॅब सर्कल, मुंबई, मुळ रा. मु. सलगी, ता. जेवरा, जि. चतरा, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

विमाननगर, येरवडा परिसरात दोन संशयीत व्यक्ती टुरिस्ट गाडीमध्ये फिरत असून या गाडीचा टुरीस्ट गाडी असल्याचा बहाणा करुन वेश्यागमनासाठी महिला पुरवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संशयित व्यक्तीचा फोन नंबर प्राप्त करुन बनावट ग्राहकाला (Fake Customer) बोलण्यास सांगितले. आरोपींनी साकारे नगर विमाननगर येथे ईस्ट फील्ड या हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले.

आरोपींनी सांगितल्याप्रमाणे दोन रुम बुक करुन सापळा रचला. काहीवेळाने आरोपी दोन महिलांना घेऊन टुरिस्ट गाडीतून (एमएच 04 जेके 6988) हॉटेलमध्ये आले. बनावट ग्राहकाने बुक केलेल्या रुममध्ये जाताच पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेऊन दोन मुलींची सुटका केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता परराज्यातून मुली आणून पुण्यामध्ये टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवून मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती आरोपींनी दिली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke),
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, महिला पोलीस हवालदार राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, पोलीस नाईक आण्णा माने, प्रमोद मोहिते,
हणमंत कांबळे, इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Prostitution racket exposed in Pune Two girls released pune police crime branch Social Security Cell

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का