Pune Crime | पुण्यातील उच्चभ्रु परिसरातील स्पा सेंटरमधील ‘सेक्स’ रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, चार तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वानवडी येथील साळुंके विहार (Salunke Vihar) या उच्चभ्रु परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostitution) चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) छापा मारला. या कारवाईत 5 जणांवर कारवाई करुन चार मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई ‘गोल्डन टच स्पा’ (Golden Touch Spa) या मसाज सेंटरवर (Pune Crime) करण्यात आली.

 

स्पा मॅनेजर झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (वय – 27 रा. कोंढवा मुळ रा. पश्चिम बंगाल), मॅनेजर सुमित अनिल होनखंडे (वय – 21 रा. कोंढवा, पुणे) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. स्पा मालक रचना संतोष साळुंखे (रा. येवलेवाडी), सार्थक लोचन गिरमे (रा. वानवडी) व लोचन अनंता गिरमे (रा. पुणे) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

साळुंके विहार या उच्चभ्रु परिसरातील गोल्डन टच स्पा नावाच्या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना (Pune Police) मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला असता, पीडित तरुणींकडून मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा रक्कम घेऊन वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई करुन दोन मॅनेजरसह स्पा सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चार तरुणींची सुटका केली. यापैकी एक छत्तीसगड, एक पश्चिम बंगाल व दोन महाराष्ट्रातील आहेत.

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Senior Police Inspector Rajesh Puranik),
पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर (PSI Supriya Pandharkar), पोलीस अंमलदार नीलम शिंदे, राजश्री मोहिते,
अजय राणे, इरफान पठाण, हणमंत कांबळे, सुरेंद्र साबळे, साईनाथ पाटील, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | prostitution under the guise of spa centre action was taken against five persons four young women were released

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा