Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! स्कूल बसच्या चाकाखाली सापडून 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | स्कुल बसच्या चाकाखाली (School Bus Accident In Pune) सापडून एका 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू (Student Death In Pune) झाल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) वडगाव खुर्द (Wadgaon Khurd) येथे घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. मनपाच्या राजयोग सोसायटीतील मुरलीधर लायगुडे रुग्णालयासमोर ब्लॉसम पब्लिक स्कूलची (Blossom Public School) बस वळण घेत होती. त्यावेळी अर्णव अमोल निकम (Arnav Amol Nikam) हा बसच्या मागच्या चाकाखाली आला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अर्णवचा जागीच मृत्यू झाला (Pune Accident News). डोळ्यादेखत अपघाताचा प्रसंग पाहिल्याने इतर शाळकरी मुले खूप घाबरली होती. (Pune Crime)

 

पुण्यातील शाळा सुरु (Pune School Reopan) झाल्या आहेत. ब्लॉसम पब्लिक स्कुल बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी राजयोग सोसायटी जवळील पीएमपीएमएलच्या बस थांब्याजवळ (PMPML Bus Stop) आली असता, बस थांब्यावर अर्णव व इतर विद्यार्थी उतरले. यानंतर स्कुल बस वळवत असताना चालकाचे लक्ष नसल्याने काही कळण्याच्या अगोदरच बसचे मागील चाक अर्णवच्या अंगावरुन गेले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अर्णवच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.(Pune Crime)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी दाखल होत बस चालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर Dattatraya Laxman Parekar (वय-49 रा. धनकवडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे (Sinhagad Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare), पोलीस उपनिरीक्षक किशोर तनपुरे (PSI Kishor Tanpure) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune accident news 12 year old student died spot school bus accident pune crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Uddhav Thackeray | PM मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले – ‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे, पण मी…’

 

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

 

Pankaja Munde | राणे समर्थकाचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करत आहेत’