Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ‘पॉपी स्ट्रॉ’ ड्रग्ससह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक (anti narcotics cell) दोनच्या पोलिसांनी 72 हजार रुपये किमतीच्या पॉपी स्ट्रॉ ड्रग्ससह (Poppy Straw Drugs) तिघांना अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 72 हजार रुपये किमतीचे 6 किलो 154 ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत पोलिसांनी जोधपुर (Jodhpur), सासवड (Saswad) आणि पुण्यातील (Pune Crime) तिघांना अटक केली आहे.

 

महेश हरमलराम बिष्णोई Mahesh Harmalram Bishnoi (वय-30 रा. आचल पार्क, काळेपडळ, हडपसर, मुळ रा. तहसील ओशिया, जि. जोधधपूर राज्य राजस्थान), विकास प्रधानराम डारा Vikas Pradhanram Dara (वय-20 रा. पांडुरंग मार्बलसमोर, सासवड), सिद्धार्थ धनपाल पाटील Siddharth Dhanpal Patil (वय-32 रा. सोपान नगर, सासवड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट (N.D.P.S. Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व पोलीस अंमलदार हे शनिवारी (दि.4) हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना पापडे वस्ती येथील सार्वजनिक रोडवर महेश बिष्णोई हा संशयास्पद आढळून आला. त्याची झडती घेतली असता 18 हजार रुपये किमतीचा 1 किलो 594 ग्रॅम अफीमच्या बोंडाचा चुरा पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन चौकशी (Pune Crime) केली. चौकशी दरम्यान हा अंमली पदार्थ विकास डारा याने दिल्याची माहिती देऊन त्याच्याकडे दोडाचुरा (Dodachura) साठा असल्याचे सांगितले.

 

त्यानुसार पोलिसांनी सासवड येथील विकास डारा याच्या राहत्या घरावर छापा मारला. त्यावेळी एका पोत्यामध्ये 30 हजार रुपये किमतीचा 2 किलो 534 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ आढळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने हा अंमली पदार्थ सिद्धार्थ पाटील याने दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पाटील याच्या घरावर छापा टाकून 24 हजार रुपये किमतीचा 1 किलो 987 ग्रॅमचा पॉपी स्ट्रॉ अंमली पदार्थ जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी,
चेतन गायकवाड, संतोष जाचक, संदिप शेळके, साहिल शेख, आझीम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड,
महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Anti-Narcotics Squad arrests three with Poppy Straw drugs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Price Today | सोन्यात किरकोळ तेजी, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

PPF Account | पीपीएफ खाते दुसर्‍या बँकेत ट्रान्सफर करणे आता झाले आणखी सोपे, या 5 स्टेपमध्ये करावे लागेल अप्लाय