Pune Crime | ‘नीरव मोदी’ प्रमाणे बँकांना गंडा घालणार्‍या पुण्यातील कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाला 5 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

दोन खासगी कंपन्यांना CBI न्यायालयाने ठोठावला प्रत्येकी एक कोटी रुपये दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | निरव मोदी (nirav modi) याने ज्या प्रकारे पंजाब नॅशनल बँकेचे (punjab national bank) लेटर ऑफ क्रेडिट (letter of credit) मिळवून काही हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. त्याप्रमाणे 300 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार पुण्यात यापूर्वीच झाला होता. बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकाची संगनमत करीत एका कंपनीच्या नावे बँकेचे लेटर ऑफ क्रेडिट मिळवून त्या आधारे अन्य बँकेतून स्वमालकीच्या दुसर्‍या कंपनीची बनावट बिले सादर करीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने (cbi special court) दोन कंपन्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये दंड ठोठावला. तसेच बँकच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन्ही कंपन्यांच्या एका सहायक अकाऊंटंटला 3 वर्षे सक्तमजुरी व दीड लाख रुपये दंड आणि दुसर्‍या सहायक अकाऊंटंटला व अन्य एका कंपनीच्या मालकाला प्रत्येकी 3 वर्षे कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा (Pune Crime) ठोठावली आहे.

विशेष न्यायाधीश जी. जी. भालचंद्र (Special Judge G. G. Bhalchandra) यांनी हा निकाल दिला आहे. व्हेरॉन अल्युमिनियम प्रा. लि. veron aluminium pvt ltd (VAPL) आणि व्हेरॉन ऑटो कॉम्प प्रा. लि. veyron auto comp pvt. ltd. pune maharashtra (VACPL) या दोन कंपन्या, कॅनरा बँकेच्या (canara bank) डेक्कन जिमखाना शाखेचे (deccan gymkhana) तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एस आर हेगडे (Ex chief manager S. R. Hegde), तसेच या दोन्ही कंपन्यांचे सहायक अकाऊंटंट गणेश जगन्नाथ कोल्हे (Assistant Accountants Ganesh Jagannath Kolhe) व गणेश राम गायकवाड (Ganesh Ram Gaikwad) आणि रत्ना मेटल मार्टचे प्रमुख मनोज सुधाकर साळवी (Manoj Sudhakar Salvi, head of Ratna Metal Mart) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. यांच्यासह श्रीकांत सवाईकर, हिंद ऑटो इंटरप्राईजेसचे मालक दिवंगत लक्ष्मण मोरे, श्वेता ट्रेडिंग कंपनीचे मालक दिवंगत मारुती चव्हाण यांच्याविरोधात सीबीआयने (CBI) दोषारोप पत्र (chargesheet) दाखल केले होते.

व्हेरॉन अल्युमिनियम आणि व्हेरॉन ऑटो कॉम्प या दोन्ही कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सवाईकर
यांनी 29 फेब्रुवारी 2016 रोजी कॅनेरा बँकेच्या डेक्कन जिमखाना शाखेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक एस आर हेगडे यांच्याकडून खोटे लेटर ऑफ क्रेडिट मिळविले.

त्या आधारे त्यांनी बँक ऑफ इंडियाकडे (Bank Of India) दुसर्‍या कंपनीचे 246 बिले सादर करुन सवलतीचा गैरफायदा घेऊन अपहार केला.
या गैरव्यवहारातून मिळालेला पैसा पुन्हा आपल्या कंपनीच्या खात्यात वळवून
त्याचा गैरवापर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज चुकविण्यासाठी केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयने 23 फेब्रुवारी 2017 रोजी गुन्हा दाखल (Pune Crime) केला होता.
नीरव मोदी याने याच प्रकारे ‘पंजाब’ बँकेचे (PNB) लेटर ऑफ क्रेडिट (letter of credit) मिळवून त्या आधारे फसवणूक (Cheating) केली आहे.

Web Title :- Pune Crime | Pune-based Canara Bank manager sentenced to 5 years rigorous imprisonment – cbi special court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

Gold Price Today | सोन्याच्या किंमती पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट दर

LPG Gas Cylinder | आज जाहीर झाले ऑक्टोबर महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवीन दर; दरात 15 रुपयांची वाढ