Pune Crime | चुहा गँगच्या म्होरक्यासह टोळी भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरोड्याच्या (Robbery) तयारीत असलेल्या चुहा गँगला (Chuha Ganga) भारती विद्यापीठ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चुहा गँगच्या म्होरक्यासह टोळीतील 5 जणांना अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) कात्रज येथील पतंगराव कदम बंगल्याचे (Patangrao Kadam Bungalow) समोरील सच्चाई माता डोंगरावर केली. आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्या मुसक्या (Pune Crime) आवळल्या.

 

चुहा गँगचा म्होरक्या तौसिफ उर्फ चुहा जमिर सय्यद Tausif alias Chuha Jamir Sayed (रा. जामा मस्जिद जवळ, संतोषनगर, कात्रज), अझरुद्दीन दिलावर शेख Azharuddin Dilawar Sheikh (वय – 22 रा. संतोष नगर, कात्रज), ईशान निसार शेख Ishan Nisar Sheikh (वय – 20 रा. अंजलीनगर, कात्रज), गणेश विजय भंडलकर Ganesh Vijay Bhandalkar (वय – 21 रा. इच्छापूर्ती चौक, कात्रज), कैफ आरीफ शेख Kaif Arif Sheikh (वय – 18 रा. कदम चाळ, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी विक्रम सावंत (Vikram Sawant) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) आयपीसी 399, 402, आर्म अ‍ॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत, आशिष गायकवाड (Ashish Gaikwad) व अभिनय चौधरी (Abhinay Chaudhary) यांना माहिती मिळाली की, सच्चाई माता डोंगरावर चुहा गँगचा म्होरक्या तौसिफ हा त्याच्या साथिदारासह कात्रज येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते, मिरची पुड, लोखंडी रॉड, मोबाईल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे हे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Police Inspector Sangita Yadav)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक धीरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta),
शिंदे, पोलीस अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, अभिजित जाधव, सचिन सरपाले, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Bharti Vidyapeeth Police Arrested leader of Chuha Gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा