Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन लुबाडले; 2 लाखांची खंडणी मागून रात्रभर ठेवले डांबून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मुंढव्यात (Mundhwa) बांधकाम करावयाचे असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला (Builders In Pune) बोलावून त्याचे अपहरण (Kidnapping News) करुन डांबून ठेवून त्याला लुबाडण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी बिबवेवाडी (Bibvewadi) येथे राहणार्‍या ३२ वर्षाच्या एका बांधकाम व्यावसायिकाने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२३/२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नयन गणेश पाटोळे Nayan Ganesh Patole (रा. नाना पेठ), अजय थोरात (Ajay Thorat), नझीम सय्यद (Nazim Syed) व त्याच्या २ ते ३ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुंढवा येथील पेट्रोल पंपासमोर तसेच येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये (Laxminagar Yerwada) १० मे रोजी रात्री सव्वा आठ ते ११ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत घडली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकामाचा छोटा व्यवसाय आहे. नझीम सय्यद याने फिर्यादी यांना मुंढवा येथे २ गुठ्याचे जागेमध्ये बांधकाम करावयाचे आहे. जागा पाहण्यासाठी या, असे सांगितले. त्यानुसार जागा पाहण्यासाठी फिर्यादी हे नझीम व त्याचा साथीदार अजय थोरात यांना बरोबर घेऊन गेले. तेथे नयन पाटोळे व त्याच्या साथीदारांनी मिळून जबरदस्तीने फिर्यादी यांना कोंडून हाताने मारहाण केली. त्यानंतर मुंढवा चौकाकडून ताडीगुप्ता चौकाकडे जाणार्‍या मेन रोडवरील डाव्या बाजूला असलेल्या फर्निचरच्या दुकानाजवळ नेले. तेथे मारहाण करुन २ लाख रुपयांची खंडणी मागितली.

त्यानंतर ४ दुचाकी गाड्यांवर फिर्यादी व त्यांचा मित्र विकी पालकर या दोघांना बसवून येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे घेऊन गेले. तेथे त्यांना कोयत्याच्या उलट्या बाजूने पालकर यांच्या दोन्ही पायाचे नडगीवर मारले. तसेच तोच कोयता नयन पाटोळे याने फिर्यादीवर उगारला. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांची दुचाकी गाडी, मोबाईल व रोख १२ हजार असा ४७ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. या प्रकारामुळे फिर्यादी घाबरुन गेले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune builder abducted and robbed 2 lakh ransom demanded overnight

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा