Pune Crime | पुण्यातील व्यावसायिकाची 2 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गुजरात राज्यातील निवडणुकीत जुन्या चलनी नोटांची गरज असल्याचे सांगून २ कोटीच्या बदल्यात ३ कोटी रुपये देतो, असे सांगून पुण्यातील एका अंडी व्यावसायिकाला तब्बल २ कोटी रुपयांना मित्रांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंडी व्यावसायिकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात (Panvel City Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबतची माहिती अशी फिर्यादी यांचा पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे अंडी विकण्याचा घाऊक व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा मित्र प्रशांत मोरे याने सुरतला राहणारे राजूभाई व आश्रफ यांना गुजरात राज्यात निवडणुकीकरता जुन्या चलनी नोटांची गरज असून त्या बदल्यात ते नवीन नोटा देत असल्याचे सांगितले. त्याने स्वत:कडील २० लाख रुपये दिले असता त्याला ३० लाख रुपये मिळाल्याचे सांगितले. त्यावर फिर्यादी यांचा विश्वास बसला. त्यांनी राजूभाई व आश्रम यांचा जवळची व्यक्ती सुरेश कदम यांची भेट घालून दिली. कमीतकमी २ कोटी रुपये असले तरच व्यवहार होईल, असे प्रशांत व सुरेश यांनी सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांचे व त्यांच्या मित्रांकडून २ कोटी रुपये जमविले. (Pune Crime)

त्यांना पैसे घेऊन पनवेल येथे बोलविण्यात आले. त्यानुसार ते २६ एप्रिल रोजी पनवेल येथे गेले. प्रशांत यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे त्यांनी दोन कोटी रुपये दिले. त्यानंतर ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या कारजवळ गेली. कारची डिकी उघडून पैसे डिकीत ठेवले. त्याचवेळी एका गाडीतून पोलिसांसारखे दिसणारे ४ ते ५ जण उतरले. व ते कारमध्ये बसले. त्यानंतर प्रशांत याने फिर्यादी यांना पोलिसांनी पैसे पकडले असल्याचे सांगितले. व लोणावळ्याला जाऊन थांबा पैसे मिळतील, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी लोणावळा येथे बराच वेळ थांबले. त्यांना दोन दिवसात पैसे मिळतील असे मोरे यांनी सांगितले. दुसर्‍या दिवशी सुरेश यांचा मुलगा अक्षय कदम याने फिर्यादी यांना १० लाख रुपये आणून दिले. उर्वरित रक्कमेसाठी त्यांनी प्रशांत व सुरेश यांना वारंवार फोन करुन पैशांची मागणी केली. परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आता त्यांनी फसवणूकीची तक्रार दिली असून पनवेल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune businessman Cheating Fraud Case of Rs 2 crore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’; मनसेचा खोचक टोला

 

Pune Metro | पुणेकरांसाठी खुशखबर ! लवकरच हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो

 

Maharashtra Political Crisis | राज्यात राष्ट्रपती राजवट येऊ शकते का ? 16 आमदारांचे निलंबन होऊ शकते का ? जाणून घ्या कायदेतज्ञांचं मत