Pune Crime | पुण्याच्या कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट भागात व्यापाऱ्यावर गोळीबार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील गजबजलेल्या भागात गोळीबार (Firing In Pune) केल्याची घटना घडली आहे. कॅम्प परिसरातील (Camp Area Pune) फॅशन स्ट्रीट (Fashion Street Pune) भागात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने छऱ्याच्या बंदूकीतून (Gun) गोळीबार केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी (Pune Crime) धाव घेतली.

 

या घटनेत तौफिक अख्तर शेख Tawfiq Akhtar Shaikh (वय-45 रा. भीमपुरा कॅम्प, पुणे) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जुल्फिकार शेख (Zulfiqar Sheikh) नावाच्या व्यक्तीने हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी शेख आणि आरोपी जुल्फिकार  शेख नावाचा व्यक्ती व्यापारी संघटनेशी (Merchant Association) संबंधीत आहेत.
त्यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होते.
याच वादातून मंगळवारी रात्री तौफिक शेख हा फॅशन स्ट्रिट परिसरातील एबीसी फार्म नावाच्या दुकानाजवळ आला
असता जुल्फिकार शेख याने त्याच्याकडे असलेल्या छऱ्याच्या बंदूकीतून गोळीबार केला.
यामध्ये तौफिक जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम (Senior Police Inspector Ashok Kadam) यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

Web Title :- Pune Crime | pune camp lashkar area firing on a trader in fashion street

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepika Padukone | हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान दीपिकाच्या हृदयाचे ठोके वाढले, तात्काळ रुग्णालयात दाखल

 

LIC चा नवीन Dhan Sanchay सेव्हिंग प्लान लाँच, जाणून घ्या त्याची सविस्तर माहिती

 

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’