Pune Crime | पुणे शहरातील कोंबिंग ऑपरेशनमध्ये 36 आरोपींना अटक; घातक हत्यारे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din) पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाने (Pune City Police) शनिवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून त्यात ३६ आरोपींना अटक केली (Pune Cops Carry Out Massive Combing Operation And Arrest 36 Criminals). आरोपींच्या ताब्यातून १२ कोयते, ४ तलवारी, पालघन, चाकू अशी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (Pune Crime)

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा (Pune Police Crime Branch) व पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांची पथके स्थापन करुन शहरातील वेगवेगळ्या परिसरात शनिवारी रात्री ९ ते रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन व तपासणी करण्यात आली. त्यात ३१४८ गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी ७१४ गुन्हेगार आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने वॉटेड गुन्हेगार (Wanted Criminal) संतोष लक्ष्मण राठोड (Santosh Laxman Rathod) याला अटक करुन पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. (Pune Crime)

 

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने सूर्यकांत ऊर्फ पंडीत दशरथ कांबळे (वय २६, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर वसाहत झोपडपट्टी, दत्तवाडी – Dattawadi) याला अटक केली. अंमली पदार्थ विरोधी पथकाने चतु:श्रृंगी परिसरातील (Chaturshringi) अवैध हुक्का पार्लरवर छापा (Hookah Parlour In Pune) टाकून २९ हजार रुपयांचे विविध हुक्का फ्लेवर, हुक्का पॉटस व इतर साहित्य जप्त केले. अनिकेत अनंत देसाई (वय ३६) व दिग्विजय सनातन नायक (वय २५, दोघे रा. गीतांजली बिल्डींग, औंध) यांना अटक केली.

 

शहरातील पोलीस ठाण्यांनी दारू विक्रीच्या १३ केसेस करुन ९ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ५ हजार ९०० रुपयांची ७२ लिटर हातभट्टीची दारु, ६ हजार ७६० रुपयांचे दारु तयार करण्याचे साहित्य, २३० रुपये रोख, ३ हजार ९०० रुपयांची २६० लिटर ताडी, ६ हजार ७६५ रुपयांच्या २८ बिअर बाटल्या, असा माल जप्त केला आहे. या कोंबिंग ऑपरेशनमध्ये १०४ आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने ५ व पोलीस ठाण्याने ४ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.

संपूर्ण शहरातील ३७६ हॉटेल/लॉजेस चेक करण्यात आले. नाकाबंदी दरम्यान ६०९ संशयित वाहनचालकांना चेक करुन १८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 

वाहतूक शाखेने ३९८ संशयित वाहन चालकांना चेक करुन १४ दुचाकी, २२ तीन चाकी, १९ चारचाकी अशा ५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shriniwas Ghadge),
प्रियंका नारनवरे (DCP Priyanka Nanaware), सागर पाटील (DCP Sagar Patil), पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), नम्रता पाटील (DCP Namrata Patil), राहुल श्रीरामे (DCP Rahul Shrirame)
यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.

 

Advt.

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान केलेली कारवाई

गुन्हे शाखा पोलीस ठाणे एकूण अटक आरोपी
आर्म्स अ‍ॅक्ट ८ ८ १६ १८
प्रोव्हिबिशन अ‍ॅक्ट १३ १३ ९
मपोकाक १४२ प्रमाणे ५ ४ ९ ९
हॉटेल/लॉजेस चेकिंग ११८ २५८ ३७६ –

 

 

Web Title :- Pune Crime | Pune cops carry out massive combing operation pune police recover over 18 weapons & arrest 36

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा