Pune Crime | लोणीकंद परिसरातून दरोड्याच्या तयारीतील 5 सराईत गुन्हेगार अटकेत

पुणे : Pune Crime | लोणीकंद परिसरात रात्री येणार्‍या जाणार्‍या वाहनांना अडवून (Pune Crime) त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत 5 गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने जेरबंद केले.

राजन गोपाल नायर (वय ३१, रा. उत्तमनगर), राहुल गोटीराम साळुंखे (वय ३३), आकाश तायप्पा कानडे (वय २१, रा. वडारवस्ती, येरवडा), अक्षय मधुकर कोळके (वय २७, रा. रायकर मळा, धायरी), सुरज दिलीप जाधव (वय २८, रा. तांबोळी मशिदजवळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू, मिरची पुड, नायलॉनची दोरी, मोबाईल व मोपेड व इतर साधने असा ७८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर यापूर्वी जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे पथक मंगळवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी पिंपरी सांडस गावाजवळील विनायक डेव्हलपर्स या बांधकाम  प्रकल्पाच्या जवळ काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना घेरुन पकडले. त्यांच्याकडील घातक शस्त्रे जप्त केली.

अधिक चौकशी केली असता रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या वाहनचालकांना अडवून त्यांना
लुटण्याचा त्यांनी कट रचला होता. त्यासाठी ते तेथे जमले असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस
निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Raj Kundra Pornography Case | शर्लिन चोपडाने शेयर केला राज कुंद्रासोबतच्या पहिल्या शूटचा फोटो, म्हणाली – ‘माझ्यासाठी नवा अनुभव होता’

ISRO | इस्रोला मोठा झटका ! EOS-3 सॅटेलाइट लॉन्च; अखेरच्या क्षणी क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाडाने मिशन ‘फेल’

Pune News | पुण्यातील विद्यार्थ्यांनी तयार केली भारतातील पहिली चालकरहित इलेक्ट्रिक कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | pune crime branch police arrest 5 criminals from lonikand area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update