Pune Crime | दुचाकी आणि जबरी चोरी करणार्‍या दोघांना अटक, 3 दुचाकीसह दोन लाखाचा माल गुन्हे शाखेकडून जप्त

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | शहरातील विविध भागातून दुचाकी तसेच जबरीच्या चोऱ्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना पुण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना (Pune Crime Branch Police) सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 दुचाकीसह दोन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

योगेश उर्फ पप्पू देवराव गोयकर (वय 26), विजय महादेव हलगुंडे (वय 23), आकाश सहदेव हजारे (वय 19, सर्व. रा.टिळेकरनगर, कोढवा) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

योगेश गोयकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर दौंड, कर्जत तसेच इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) गुन्हे दाखल आहेत.
शहरात वाहन चोरी आणि मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
यापार्श्वभूमीवर या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. यादरम्यान पोलीस अंमलदार महेश वाघमारे आणि अश्रूबा मोराळे यांना माहिती मिळाली होती.
की, गुन्हेगार योगेश गोयेकर व त्याच्या साथीदाराकडे चोरीची दुचाकी आहे. त्यानुसार युनिट पाचच्या पथकाने सापळा रचून पकडले.
त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर ती चोरीची असल्याचे लक्षात आले.
माहितीत याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
अधिक चौकशीत त्यांनी शहरात विविध भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून 5 गुन्हे उघडकीस आणला आहे. तिघांकडून 1 लाख 90 हजाराचा ऐवज जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त अशोक मोराळे (additional commissioner of police ashok morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (deputy commissioner of police shriniwas ghadge), सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे (assistant commissioner of police laxman borate) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहायक ल निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस कर्मचारी रमेश साबळे, महेश वाघमारे, आश्रबा मोराळे, अजय गायकवाड, चेतन चव्हाण, दया शेगर, प्रविण काळभोर, विशाल भिलारे, दिपक लांडगे, प्रमोद टिळेकर, सय्यद दाऊद, अमर उगले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : pune crime | pune crime branch police arrest two criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Actress Sagarika Sona Suman | ‘राज कुंद्रा म्हणाला ‘न्यूड ऑडिशन दे’, अभिनेत्री सागरिका सोना सुमनचा धक्कादायक आरोप

Indian Railways | यात्रीगन कृपया ध्यान दें ! आता स्लीपरच्या खर्चात घ्या AC इकॉनॉमी क्लासचा आनंद, ‘या’ पध्दतीची असेल व्यवस्था; जाणून घ्या

Mumbai High Court | ‘कोरोना काळात लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत’; जाणून घ्या उच्च न्यायालयानं नेमकं काय सांगितलं