Pune Crime | घरातून निघून गेलेल्या पत्नीला शोधणार्‍या पतीला चोर समजून बेदम मारहाण; चांदणी चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडण झाल्याने घरातून निघून गेलेल्या पत्नीचा शोध घेत असताना तिघा जणांनी पतीला चोर समजून लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन पाय फ्रॅक्चर केल्याची धक्कादायक घटना चांदणी चौकाजवळील रोडवर घडली. याप्रकरणी पाषाण गावात (Pashan Gaon) राहणार्‍या एका २७ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद (३५९/२१) दिली आहे.

 

त्यावरुन पोलिसांनी वैभव विष्णु हरपुडे (वय २२, रा. कर्वे रोड), विलासकुमार मिश्रा (वय २७, रा. मुळशी रोड) आणि श्रावणकुमार नरेश भूमिया (वय २६, रा. मुळशी रोड) या तिघांविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  आणि त्यांची पत्नी यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे त्यांची पत्नी घरातून निघून गेली होती. फिर्यादी हे तिचा शोध घेत मंगळवारी पहाटे पावणे दोन वाजता चांदणी चौकाजवळील शोभा निसारा सोसायटीसमोरील रस्त्यावर आले होते. यावेळी तिघांनी त्यांना चोर समजून शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या उजव्या पायाचे घोट्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Crime News chandani chowk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | खुशखबर ! धनत्रयोदशीपूर्वी ‘स्वस्त’ झाले सोने; सर्वोच्च स्तरापासून आज 4 हजार रुपयांपर्यंत मिळतंय ‘स्वस्त’, जाणून घ्या दर

Aadhaar Card | तुमचा सुद्धा बदलला असेल पत्ता तर अशाप्रकारे बदला, ‘या’ 21 कागदपत्रांचा करू शकता वापर; जाणून घ्या

Maharashtra Covid Vaccination | महाराष्ट्राने केला विक्रम; 3 कोटी लोकांचे पूर्ण लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य