Pune Crime | सलूनमध्ये ‘दाढी’ करणं तरुणाला पडलं दोन लाखात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) ऊरळी कांचन (Uruli Kanchan) येथील एका तरुणाला सलूनमध्ये (salon) जाऊन दाढी (shave) करणे चांगलेच महागात पडलं आहे. बँकेतून काढलेली दोन लाखाची रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून दाडी करण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी डिकीतून रोकड लंपास (Cash stolen) केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील (Pune Crime) ऊरळी कांचन मध्ये खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सुनिल यादव (वय-25 रा. ऊरळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊरळी कांचन येथील एलाईट चौकातील अ‍ॅक्सिस बँकेतून (Axis Bank) यादव यांनी दोन लाख रुपये काढले होते. ही रक्कम गाडीच्या डिक्कीत ठवली. त्यानंतर एका रुग्णालयाच्या बाहेर गाडी लावून ते सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेले होते.

दाढी करुन आल्यानंतर ते दुचाकीजवळ आले. त्यावेळी त्यांनी गाडीची डिक्की उघडी असल्याचे दिसले.
डिक्कीत ठेवलेली दोन लाखाची रोकड नसल्याचे लक्षात (Pune Crime)  आल्यानंतर त्यांनी परिसरात चौकशी केली मात्र,
कोणीच काही पाहिले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | pune crime news in marathi of loni kalbhor police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Crime | 3 महिन्याच्या ‘डॉबरमॅन’ कुत्र्याचे दोन्ही कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेंवर FIR

Multibagger Stock | ‘या’ कंपनीने 10 वर्षात 1 लाखाचे केले 86 लाख, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे