Pune Crime | प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी चोरली कार, पुणे पोलिसांनी काही तासाच आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी आणि आईला वाढदिवसाची गिफ्ट देण्यासाठी केलेल्या धाडसामुळे एका तरुणाला जेलची हवा खावी लागली आहे. ओएलएक्सवर गाडी पसंत पडल्यानंतर प्रत्यक्ष गाडी पाहण्यासाठी नाना पेठेत आलेल्या एकाने होंडा कार पळवून नेली. मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी काही तासात कार जप्त करुन (Pune Crime) तरुणाला बेड्या ठोकल्या. इशांत शर्मा (वय-25 रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली होंडा कार एकाने विकत घेण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना समर्थ पोलिसांना एके ठिकाणी ही कार आणि आरोपी शर्मा दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने कार चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी कार चोरण्याचे कारण विचारले असता कारण ऐकून पोलीस ही अवाक झाले. (Pune Crime)

 

आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने ही कार प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी आणि आईला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी चोरल्याची कबुली दिली. ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली होंडा कार पसंत पडल्यानंतर त्याने व्यवहार ठरवला. दोन दिवसांनी आईचा वाढदिवस असून तिला गिफ्ट द्यायची असल्याचे सांगून दोन दिवसांनी येतो असे शर्माने सांगितले होते.

दरम्यान, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास तो नाना पेठेतील कबीर चौकात कार विकत घेण्यासाठी आला.
गाडी आईला दाखवून आणतो असे सांगून तो फिर्यादीच्या भावासह गाडी घेऊन गेला.
पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर प्रेयसीला व आईला गाडी दाखवून आणतो,
तुम्ही इथेच थांबा असे सांगून फिर्यादीच्या भावाला गाडीतून खाली उतरवले.
त्यानंतर शर्मा विद्यापीठाच्या आवारातून गाडी घेऊन पळून गेला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Crime | Stolen car to impress his girlfriend, Pune police caught a few hours Savitribai Phule Pune University SPPU

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…