Pune Crime | झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर कोयत्याने वार करुन लुटले; बालेवाडीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नोकरी नाही, रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करुन पैसे मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यासाठी त्यांना रात्रीअपरात्री डिलिव्हरी देण्यासाठी जावे लागते. डिलिव्हरी देण्यासाठी गेल्यानंतर झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे (Zomato Delivery Boy) मुख्य साधन असलेली मोटारसायकल चोरट्यांनी चोरुन नेली होती. आता पहाटे एका डिलिव्हरी बॉयला चौघांनी कोयत्याने वार करुन (Pune Crime) लुटल्याची घटना बालेवाडी (Balewadi) गेट नं २ जवळ पहाटे 2.30 वाजता घडली. याप्रकरणी सौरभ उत्तम गंगणे (वय २१, रा. शास्त्रीनगर, काळेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, सौरभ हे झोमॅटोची डिलिव्हरी करण्याचे काम करतात. मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ते डिलिव्हरी देऊन जात होते. त्यावेळी दोन मोटारसायकलीवरुन चौघे जण आले. त्यांनी निकमार कॉलेजच्या (Nikmar College) गेटजवळ त्यांना थांबविले. चिखलीला जायचा रस्ता सांग असे म्हणून त्यांना अडविले. त्यांच्यातील एकाने कोयत्याने त्यांच्यावर वार केले. त्यांनी डावा हात मध्ये केल्याने तो वार त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बसला. (Pune Crime)

या हल्ल्याने तो खाली पडला. तेव्हा दुसर्‍याने त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले.
पाकिटात १७०० रुपये, आधारकार्ड (Aadhaar Card), पॅन कार्ड (PAN Card), दोन बँकांचे एटीएम कार्ड तसेच (ATM Card)
मोबाईल व सॅक, त्यामधील मोबाईलचा चार्जर, ब्ल्युटुथ असे साहित्य जबरदस्तीने लुटून चौघे राधा चौकाच्या दिशेने निघून गेले.
चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :-  Pune Crime | pune criminals stabbed Zomato delivery boy with a scythe and robbed him balewadi incident Chaturshringi Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा