Pune Crime | पुण्यातील मोक्क्याच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार सनी हिवाळेचा कारागृहातून बाहेर येताच लाकडी दांडके, दगडाने ठेचून खून, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्काच्या (MCOCA Action) Mokka गुन्ह्यातून कारागृहातून (Prison) बाहेर येताच सराईत गुन्हेगार (Pune Criminals) सनी हिवाळे (Sunny Hivale) याचा लाकडी दांडक्याने आणि दगडाने ठेचून निर्घृण खून (Murder In Pune) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) वानवडी (Wanwadi) परिसरात घडली आहे. सनी हिवाळे याचा सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला करुन खून केला. तर सनीचा साथीदार साहील इनामदार (Sahil Inamdar) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये (Sasoon Hospital) उपचार सुरु आहे. ही घटना मंगळवारी (दि.12) रात्री नऊच्या सुमारास वानवडी येथील मसोबा चौक काळेपडळ (Masoba Chowk Kalepadal) परिसरात घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हिवाळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली (Pune Crime) होती. हिवाळे हा शनिवारी (दि.9) कारागृहातून बाहेर आला होता. काल रात्री तो त्याच्या मित्रासोबत चौकात उभा होता. त्यावेळी त्याठिकाणी एक वाढदिवस साजरा करण्यात येत होता. त्याठिकाणी तो गेला होता. त्यावेळी झालेल्या वादातून सहा ते सात जणांच्या टोळक्याने त्याला लाकडी दांडक्याने व दगडाने बेदम मारहाण (Beating) केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सनीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Criminals Sunny Hivale Murder Case Wanwadi Police Station Limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा