Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक तरुण बेरोजगार झाले. पैशांची अडचण सोडवण्यासाठी तुरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले. अशाच एका सायकल चोर (Bicycle thief) आशिकला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Pune Crime) आहेत. पुणे पोलिसांनी या चोरट्याकडून महागड्या सायकली जप्त (Pune Crime) केल्या आहेत. आशिक जीवन आले (वय-24 रा. मुंढवा, मूळ रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हडपसर पोलिसांनी (hadapsar police station) आशिक आले याच्याकडून 1 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 14 सायकली जप्त केल्या आहे. आरोपी आशिकने पुणे शहराच्या विविध भागातून (Various parts of Pune city) सायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोरोना कालावधीत कामधंदा नसल्याने पैशांची अडचण सोडवण्यासाठी आशिक आले याने सायकल चोरी केली.

फिटनेस वाढविण्यासाठी शहरात अनेकांकडून महागड्या सायकली खरेदी करण्यावर भर दिला जात
आहे. हीच संधी साधून आणि कामधंदा नसल्याने आरोपीने या सायकल चोरण्याची शक्कल लढवली.
त्याने गार्डनजवळ सायकलवर येणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन सायकल चोरण्यास सुरुवात केली.
आरोपीने हडपसर परिसरातील ग्लायडिंग सेंटर (Gliding Center), भोसले गार्डन (Bhosle Garden), मगरपट्टा सिटी (magarpatta city), मांजरी, हडपसर परिसरातून सायकली चोरल्या. मांजरी बुद्रुक येथील एका तरुणाची 19 जुलै रोजी सायकल चोरीला गेली होती. त्याने हडपसर पोलिसांकडे तक्ररार दिली होती.

हे देखील वाचा

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 250 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Changes From 1st August | 1 ऑगस्टपासून बदलतील दैनंदिन जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम, तुमच्यावर होईल थेट परिणाम, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | pune cycle theif arrested by police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update