Pune Crime | फरासखाना पोलिसांकडून सराईत चोरटा गजाआड, 4 रिक्षा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरीच्या (Vehicle Theft) घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे पोलिसांकडून वाहन चोरांचा शोध घेतला जात असताना फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police) एका सराईत रिक्षा चोरणाऱ्यास (Rickshaw Thief) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीने पुणे शहरातील (Pune Crime) विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रिक्षा चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 4 रिक्षा जप्त (Seized) केल्या आहेत. ही कारवाई आळंदी येथील केळगाव रोड (Kelgaon Road Alandi) येथे केली.

 

संतोष उर्फ अशोक चंद्रकांत ढेरे Santosh alias Ashok Chandrakant Dhere (वय-46 सध्या रा. चाकण चौक, गोधळे आळी, केळगाव रोड, आळंदी, पुणे मुळ रा. राशींद ता. कर्जत जि. अहमदनगर Ahmednagar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील (Faraskhana Police Station) तपास पथकाचे (Investigation Team) पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. फरासखाना येथे दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आळंदी येथे असल्याची माहिती पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण (Sayaji Chavan) व अभिनय चौधरी (Abhinay Chaudhary) यांना मिळाली. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरुन तपास पथकाने आळंदी येथील केळगाव रोड येथे आरोपीचा शोध घेतला.
आरोपीला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशी दरम्यान त्याने फरासखाना, लष्कर (Lashkar Police Station) आणि चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandan Nagar Police Station) हद्दीतून 4 रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 4 रिक्षा जप्त केल्या आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landage),
पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद (Police Inspector Shabbir Sayyed), सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijeet Patil), मनोज अभंग (API Manoj Abhang), पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, मेहबुब मोकाशी, मोहन दळवी, रिजवान जिनेडी, वैभव स्वामी, राकेश क्षिरसागर, ऋषीकेश दिघे, विशाल साबळे, महावीर वलटे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Faraskhana police Arrest Criminal and seized 4 rickshaws

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा