Pune Crime | हवेली परिसरात दहशत माजविणाऱ्या कोयत्या गँगला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेला धक्काबुक्की करत कोयत्याच्या धाकाने (Koyta Gang) परिसरात दहशत माजवणाऱ्या पाच जणांच्या कोयता गँगला हवेली पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही घटना (Pune Crime) रविवारी (दि.15) हवेली तालुक्यातील गोऱ्हे बुद्रुक येथे घडली होती. टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून, लोकांना शिवीगाळ व दमदाटी करुन परिसरात दहशत माजवली होती.

 

सुरज लागींदर ठाकुर (वय-21), निलेश श्रीराम साह (वय-23), अक्षय सुरेश चव्हाण (वय-23), सागर कांतु पाटील (वय-22) निकुन उर्फ अनिकेत विनायक भोर (वय-22 सर्व रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीविरुद्ध खून (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), मारहाण, खंडणी (Extortion) मागणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोयता जप्त केला आहे. आरोपींनी महिलेला शिवीगाळ व दमदाटी करुन धक्काबुक्की केली होती.(Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील (Deputy Divisional Police Officer Bhausaheb Dhole Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार (Police Inspector Sadashiv Shelar),
सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे (API Niranjan Ranware), नितीन नाम, पोलीस उपनिरीक्षक आंबेकर,
पोलीस अंमलदार पाटसरकर, राणे, दिपक गायकवाड, राजेंद्र मुंडे, रजनीकांत खंडाळे, मकसूद सय्यद यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | pune haveli gorhe budruk koyta gang arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant | अखेर आदिलने पोस्ट शेअर करत राखीबरोबर लग्नाचा केला खुलासा; म्हणाला ‘मी राखीशी लग्न केले नाही असे…’

MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा

Marathwada Teacher Constituency Election | मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरीचा फटका; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने केली बंडखोरी