Pune Crime | व्याजाच्या पैशांसाठी धमकी देणारा खासगी सावकार रवि पवारला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
258
Pune Crime Pune Kondhwa Police Arrest Private Lender Ravi Pawar
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी (Interest Money) शिवीगाळ करुन धमकी (Threat) देणाऱ्या खासगी सावकाराच्या (Private Lenders In Pune) कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत. रवी पवार Ravi Pawar (वय – 38 रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. आरोपीने एक लाख रुपये 12 टक्के व्याजाने देऊन भलीमोठी रक्कम वसुल केली. त्यानंतरही व्याजाच्या पैशासाठी त्याने तगादा (Pune Crime) लावला होता.

 

याप्रकरणी त्रिशिलसिंह रुद्राजीराव राजे महाडिक Trishilsinh Rudrajirao Raje Mahadik (वय – 46 रा. किंग्न ओरा सोसायटी, हांडेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली. पोलिसांनी (Pune Police) रवी पवार याच्यावर महाराष्ट्र सावकारी प्रतिबंध कायदा (Maharashtra Lending Prevention Act) कलम 39,45 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली. हा प्रकार 2018 ते आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीने आरोपीकडून प्रत्येकी 1 लाख रुपये 12 टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते. त्याबदल्यात सेक्युरिटी म्हणून दोन चेक (Check) घेऊन 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर (Stamp Paper) हात उसने अडीच लाख रुपये घेतल्याचे लिहून घेतले. मात्र, प्रत्यक्षात फिर्यादी यांना 25 हजार व पत्नीला 28 हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम व्याजाचा पहिला हप्ता, वकिलाची फी, स्टॅम्प खरेदी अशी कट करुन घेतली.

 

फिर्यादी यांनी एप्रिल 2022 पर्यंत आरोपी रवी पवार याल 4 लाख 80 हजार रुपये व्याज दिले आहे.
यानंतर आरोपीने आणखी व्याजाची मागणी करुन वेळेवर व्याज देण्याची मागणी करुन शिवीगाळ केली.
तसेच धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अखेर फिर्यादी यांनी रवी पवार याच्या त्रासाला वैतागून कोंढवा पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.17) फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Kondhwa Police Arrest Private Lender Ravi Pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा