Pune Crime | तिप्पट पैसे फेडूनही जीवे मारण्याची धमकी देणारा कोथरूड परिसरातील सावकार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एक लाख रुपयांच्या कर्जावर ३ लाख १४ हजार रुपये फेडले…
Pune Crime Pune Kothrud Police Arrest Money Lender
File Photo
ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एक लाख रुपयांच्या कर्जावर ३ लाख १४ हजार रुपये फेडले असतानाही २ दुचाकी गहाण ठेवून घेऊन जीवे मारण्याची धमकी देत आणखी ७० हजार रुपयांची मागणी करणार्‍या सावकाराला (Money Lender In Pune) पोलिसांनी आपला हिसका दाखविला आहे. (Pune Crime)

 

संदीप दत्तात्रय भगत Sandeep Dattatray Bhagat (वय ३६, रा. जयभवानीनगर, पौड रोड, कोथरुड) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.

 

याप्रकरणी प्रसाद शिवराम परब (वय ५०, रा. जयभवानीनगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६५/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद परब हे इलेक्ट्रीशियन आहेत. त्यांनी गरजेपोटी सप्टेबर २०१९ मध्ये संदीप भगत याच्याकडून १० टक्के व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. त्याने एक महिन्याचे १० टक्क्याने १० हजार रुपये व्याज कपात करुन ९० हजार रुपये फिर्यादीस दिले. त्यापोटी फिर्यादी यांनी मुद्दल व व्याज असे मिळून ३ लाख १० हजार रुपये व ४ हजार रुपये दंड असे ३ लाख १४ हजार रुपये दिले. असे असतानाही भगत याने फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या दोन दुचाकी फिर्यादी यांच्याकडून धमकावून जबरदस्तीने त्याच्याकडे ठेवून घेतल्या. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे आणखी ७० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करुन भगत याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Kothrud Police Arrest Money Lender

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Total
0
Shares
Related Posts