Pune Crime | लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील थंड हवेचे ठिकाण (Hill Station) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा (Lonavala) येथे राज्यातील कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेल्या टायगर पॉईंट जवळ (Tiger Point, Lonavala) पर्यटकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची (Robbery) घटना घडली होती. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala Rural Police) पर्यटकांना लुटणाऱ्या चिंतन पठारे (Chintan Pathare) आणि सुनील आखाडे (Sunil Akhade) यांना अटक (Arrest) करुन चोरीच्या गुन्ह्यातील (Pune Crime) मुद्देमाल जप्त करुन 24 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे. (Pune Rural Police)

 

लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करुन, धारदार शस्त्राचा धाक दाखवून अर्धा तोळे सोने, मोबाईल असा ऐवज लुटून पळून गेले (Pune Crime) होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन 24 तासात गुन्हा उघडकीस आला. तसेच दोघांना अटक करुन त्यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील सोने (Gold), मोबाईल (Mobile) आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त (Bike seized) केली आहे. (Pune Crime)

 

लोणावळा परिसरातील टायगर पॉईंट जवळ फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची (Tourists) नेहमीच गर्दी असते. त्यातच शस्त्राचा धाक दाखवून आणि दमदाटी करुन पर्यटकांना लुटण्याची घटना घडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Lonavala Tiger Point Tourists Robbery Two Criminals Arrested By Loanavala Rural Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा