×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | पुण्यातील मंगळवार पेठेत बारमध्ये घुसून गुंडांचा 'राडा'

Pune Crime | पुण्यातील मंगळवार पेठेत बारमध्ये घुसून गुंडांचा ‘राडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | बारमध्ये शिरुन वेटरशी वाद घालून हॉटेलच्या भागीदाराला मारहाण करुन काचा फोडून मोबाईल चोरुन नेण्याचा प्रकार समोर आला (Pune Crime) आहे.

याप्रकरणी नितेशसिंह दिलीपसिंह हजारी (वय ३२, रा. वानवडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात Samarth Police Station (गु. र. नं. १७२/२१) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत लिंगप्पा तुंगे (वय २२, रा. मंगळवार पेठ) याला अटक केली आहे. ही घटना मालधक्का चौकातील (maldhakka chowk pune) रेड चिली रेस्टॉरंट अँड बार (red chilli bar and restaurant) येथे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

फिर्यादी यांच्या रेस्टॉरंटमध्ये मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी वेटरशी विनाकारण वाद घातला. हा वाद मिटविण्यासाठी फिर्यादीचे पार्टनर अभिजित गोरेकर (वय २९) हा गेला असताना आरोपींनी त्यांना व मॅनेजर सुविध पावले यांना धक्काबुक्की करुन कानाखाली मारली. अभिजित यांच्या डोक्यात दारुची मोकळी बाटली फोडून जखमी करण्याची भिती (Pune Crime) दाखवली. बारच्या काचा फोडून काऊंटरवर ठेवलेला मोबाईल दहशत दाखवून घेऊन गेले. जाताना घाईमध्ये आरोपींनी त्यांची मोटारसायकल तेथेच ठेवून गेले. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

 

Web Title : pune crime | pune mangalwar peth red chilli bar and restaurant news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात हप्ता देण्यावरुन दुकानदाराला मारहाण करुन खंडणी उकळली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

Gravity Foundation | ग्रॅव्हिटी फाउंडेशनचा उपक्रम ! देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे उद्घाटन

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! ‘या’ दिवशी येतील 10व्या हप्त्याचे पैसे, ‘या’ शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

Fingernails | नखांचा रंग पाहून ओळखा आरोग्याची स्थिती, ‘हे’ 8 आजार जाळ्यात ओढू शकतात; जाणून घ्या कसे ओळखावे

Diabetes | मधुमेह ‘कंट्रोल’ करायचाय तर नाश्ता करताना अजिबात करू नका ‘ही’ चूक; जाणून घ्या 

Must Read
Related News