Pune Crime | अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध, तरुणासह वडिलांविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अल्पवयीन (Minor) असल्यापासून जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेऊन नंतर लग्नास नकार देणारा तरुण आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दौंड तालुक्यातील (Daund Taluka) मळद येथील तरुणाने पीडित मुलीला लग्न करण्याचे आमिष (Lure of Marriage) दाखवून 2016 पासून तिच्यावर लैगिक अत्याचार (Sexual Harassment) केले. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कुलदीप पांडुरंग कदम (Kuldeep Pandurang Kadam) व त्याचे वडिल पांडुरंग कदम Pandurang Kadam (दोघे रा. चिखली, ता. श्रीगोंदा) यांच्यावर IPC 376, 315, 506, 34, 4, 6, 8, 12 सह बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला (Pune Crime) आहे.

 

मळद येथील पीडित तरुणीने दौंड पोलीस ठाण्यात (Daund Police Station) तरुण आणि त्याच्या वडिलांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर 2016 साली पुढील शिक्षणासाठी कुरकुंभ येथील नातेवाईकाच्या घरी राहत असताना नात्यातील एक तरुण नेहमी येत होता. या तरुणाने पीडित तरुणीला ‘तु मला खूप आवडते, तुझ्याशिवाय जगू शकत नाही’ असे म्हणत तिला लग्नाचे वचन दिले. त्यानंतर तिला चारचाकी गाड्यांमधून बारामती (Baramati), टेंभुर्णी (Tembhurni) या ठिकाणी नेहून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. (Pune Crime)

शरीर संबंधामधून गर्भधारणा (Pregnancy) होऊ नये यासाठी तिला वारंवार गोळ्या खाऊ घातल्या.
हे संबंध 2016 ते 2022 पर्यंत चालू होते. पीडित मुलीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.
तरुणाच्या वडिलांनीही पीडित तरुणीला तुमचे लग्न लावून देतो असे सांगितले.
परंतु त्यानंतर वडिलांनीही लग्न लावून देण्यास नकार दिला. यानंतर तरुणीने 8 मे रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
पीडितेने तक्रार देऊन 17 दिवस उलटूनही पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | pune minor girl rape case crime filed against father along with youth

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा