Pune Crime | तक्रार दिल्याच्या रागातून महापालिका अभियंता व ठेकेदाराकडून मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महापालिकेने (Municipal Corporation) केलेल्या ड्रेनेजच्या कामात भ्रष्टाचार (Corruption in drainage work) झाल्याच्या संदर्भात माहिती मगावणाऱ्या तक्रारदाराला अभियंता (Engineer) आणि ठेकेदार (contractor) यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात (Pune News) उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) संबंधितांवर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

संदीप चंद्रकांत ओझा Sandeep Chandrakant Ojha (वय-38 रा. गंजपेठ, महात्मा फुले वाड्याजवळ, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओझा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ड्रेनेज विभागातील उप अभियंता ललीत बेंद्रे (Deputy Engineer Lalit Bendre), अभियंता प्रकाश कुंभार (Engineer Prakash Kumbhar), ठेकेदार लालु काळूराम देवकर (Contractor Lalu Kaluram Deokar), त्यांचा भाऊ (नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप ओझा यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये (Bhavani Peth Regional Office) ड्रेनेजच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात महापालिकेच्या सावरकर भवन येथील ड्रेनेज विभागातील उप अभियंता ललीत बेंद्रे आणि अभियंता प्रकाश कुंभार तसेच ठेकेदार लालु देवकर यांच्या विरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीचा राग मनात धरुन त्यांनी फिर्यादी संदीप ओझा यांना मारहाण केली.

Pune Crime | pune municipal Corporation engineer and contractor fatally attacked the complainant

ओझा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्राऊंड लेवलवर मी व निर्मल तसेच ललीत बेंद्रे व प्रकाश कुंभार लिफ्टमधून बाहेर पडत होतो. त्यावेळी लिफ्टच्या समोरील मोकळ्या जागेत लालु देवकर व त्याचा भाऊ यांनी मला पाहताच आता तु आम्हाला सापडला, तुला मारुन टाकतो असे म्हणून माझ्या सोबत असलेले बेंद्रे यांनी याला आत्ताच मारुन टाका असे म्हणाले. तर कुंभार यांनी याला कायमचा संपून टाका आमचा त्रास कमी होईल असे म्हणाला.

त्यावेळी देवकर याने त्याच्या कमरेला असलेला कोयता बाहेर काढून माझ्या अंगावर धावून आला.
त्याने माझ्या डोक्याच्या उजव्या बाजूस मारुन जखमी केले. तर देवकर याच्या भावाने पाठिमागून
येऊन फायटरने माझ्या डाव्या बरगडीवर मारले, असे ओझा यांनी तक्रारीत म्हटले आहे. ओझा यांच्या
तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार करू शकते मोठी घोषणा, बेसिक सॅलरी 15000 ने वाढून होऊ शकते 21000

Crime News | खळबळजनक ! महापौराची गोळ्या झाडून हत्या; भाजप आमदाराचं कनेक्शन?

Pune Corporation | विकास आराखड्याच्या भूमिकेवर महापौर मोहोळ ठाम ! समाविष्ट गावांचा विकास आराखडा महापालिकेकडेच द्या, महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | pune municipal Corporation engineer and contractor fatally attacked the complainant

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update