Pune Crime | पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात NCP महिला पदाधिकाऱ्याला मारहाण; BJP च्या तिघांवर ‘FIR’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये सोमवारी जोरदार गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळालं. त्यावेळी कार्यक्रमामध्ये आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी हात उगारल्याचं समोर आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपच्या 3 कार्यकर्त्यांच्या विरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर सभागृहामध्ये (Balgandharva Rangmandir Pune) मंत्री स्मृती इराणी यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशनासाठी स्मृती इराणी बालगंधर्व रंगमंदिरात दाखल झाल्या होत्या. यावेळी तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. (Pune Crime)

 

कार्यक्रमादरम्यान, पोलिस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गोंधळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यावर हात उगारला असल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, भाजपच्या 3 कार्यकर्त्यांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

”शांततेच्या मार्गाने महागाईच्या विरोधात आपला विरोध प्रकट करीत असताना
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्याने मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोणत्याही परिस्थितीत एक पुरुष महिलेला मारहाण करतो हे अजिबात स्वीकारार्ह नाही.
या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.” असं सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Pune Crime | pune ncp bjp activist clash case filed against three bjp workers in deccan police over slam ncp woman in bal gandharva rang mandir during smriti irani programme

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा