Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीचा आणि मुलाचा प्राण वाचवताना पतीचा मृत्यू, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना

पुणे / मावळ : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मावळ तालुक्यातील (Maval Taluka) पवना धरणाच्या बॅकवॉटर (Pavana Dam Backwater) परिसरात बुडून (Drown) एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. पलिकडच्या बाजूला जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि नदी पात्रात गाळ साचल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. राम लक्ष्मण पवार (Ram Laxman Pawar) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राम पवार यांनी आपला पाय गाळात रुतलेला असताना स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मुलाला आणि पत्नीला पुढे ढकलून देत त्यांचे प्राण वाचवले. मात्र, त्यांना स्वत:चे प्राण वाचवता आले नाहीत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त (Pune Crime) होत आहे.

 

पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ (Maval Wildlife Ranger) आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा (Shivdurg Rescue Team Lonavla) यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पथकांनी बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेतला. काही तासांनी राम पवार यांचा मृतदेह सापडला. (Pune Crime)

 

त्यावेळी नेमकं काय घडलं ?
मयत राम पवार हे आपल्या पत्नी आणि मुलासह बॅक वॉटरच्या पलिकडच्या बाजूला जात होते. यावेळी त्यांच्या खांद्यावर लहान मुलगा होता तर दुसऱ्या हातात पत्नीचा हात होता. यावेळी त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि नदी पात्रातील गाळात त्यांचे पाय रुतले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मुलाला आणि पत्नीला पुढे ढकलले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, राम पवार यांचा यामध्ये मृत्यू झाला.

 

Web Title :- Pune Crime | pune pimpri chinchwad mawal pavna dam backwater man dies after drowning

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा