Pune Crime | व्यावसायिकाची 97 लाखाची रोकड चोरणारी दुकली गजाआड; पुणे व नगर पोलिसांची संयुक्त कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या सुकामेवा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाची कारमध्ये ठेवलेली 97 लाखांची रोकड कारसह चोरून (stealing rs 97 lakh) नेल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली होती. पुण्यात (Pune Crime) घडलेल्या या गुन्ह्यातील आरोपींना पुणे पोलीस आणि नगर पोलिसांनी (nagar police) बेड्या (arrest) ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून 60 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

विजय महादेव हुलगुंडे Vijay Mahadev Hulgunde (वय-25 रा. काटेवाडी, जामखेड, नगर), नाना रामचंद्र माने Nana Ramchandra Mane (वय-25 रा. मलठण, कर्जत, नगर)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 50 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पुणे पोलीस (Pune Police) आणि कर्जत पोलिसांनी (Karjat Police) संयुक्त कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा सुकामेवा विक्रीचा व्यवसाय आहे.
सोमवारी ते दिवसभर मालाची विक्री करुन जमा झालेली रक्कम घेऊन जात होते.
फिर्यादी हे लघुशंका करण्यासाठी उतरल्यानंतर कारमध्ये ठेवलेली 97 लाखाची रोकड कारसह चालकाने पळवून नेली.
याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर पोलिसांना माहिती देण्यात आली.
नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी आरोपींना शोधण्याचे आदेश दिले.

दरम्यान, येरवडा पोलीस (Yerawada Police) आणि गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस (Crime Branch Unit 5 Police) आरोपींचा शोध घेत होते.
कर्जत पोलीस तपास करत असताना संबंधित आरोपी पुरंदरमधील विर येथे असल्याची माहिती मिळाली.
आरोपी कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) पसरिसरातील असल्याने त्यांची गुन्ह्याची पद्धतीची माहिती असल्याने कर्जत पोलिसांनी तात्काळ हालचाल केली.
क्राईम युनिट पाचच्या पोलिसांना वीर येथे बोलवण्यात आले.
आरोपी वीर येथील एका शाळेजवळ लपून बसले होते.
आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता नाना माने हा पोलिसांच्या हाती लागला मात्र विजय हुलगुंडे पळून गेला.
कर्जत पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडले.

 

आरोपींना कर्जत पोलीस ठाण्यात आणून येरवडा पोलीस स्टेशनचे (Yerawada Police Station) तपासी अधिकारी (Investigating Officer)
रविंद्र आळेकर (Police Inspector Ravindra Alekar) आणि क्राईम युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare) यांच्या ताब्यात (Pune Crime) देण्यात आले.
कर्जत आणि पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, प्रसाद लोणारे व कर्जत पोलिसांच्या मदतीने आरोपींकडून 60 लाक रुपये जप्त केले. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | pune police and nagar police arrested two thieves for stealing rs 97 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | 83 लाख रुपये घेऊनही विवाहितेचा छळ, महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक

ACB Trap on Sujata Patil | वरिष्ठ पोलिस अधिकारी सुजाता पाटील लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Income Tax Department | प्राप्तिकर कडून ‘मध्यस्थी’ करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश; क्रीम पोस्टिंगसाठी तब्बल ‘इतके’ कोटी?