Pune Crime | API असल्याचे सांगून पोलिसांना केली धक्काबुक्की ! पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात लपून बसलेल्या तोतया पोलीस अधिकार्‍याला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चारचाकी गाडी विकण्याचा बहाणा करुन पनवेलमध्ये (Cheating In Panvel) फसवणूक केल्यावर तो पुण्यात येऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच त्याने आपण एपीआय Assistant Police Inspector (API) असल्याचे बतावणी करुन पोलिसांना धक्काबुक्की तू मला नाव पत्ता विचारणारा कोण असे म्हणून अरेरावी करणार्‍या तोतया अधिकार्‍यास (Bogus Police Officer) पोलिसांनी पकडले. (Pune Crime)

सिद्धेश्वर सुभाष नागरे Siddheshwar Subhash Nagre (वय ३३, रा. पनवेल, रायगड, मुळ बुलढाणा) असे अटक केलेल्या या तोतया अधिकार्‍याचे नाव आहे. (Pune Crime)

या प्रकरणी गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) पोलीस अंमलदार सचिन पवार (Policeman Sachin Pawar) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर नागरे याने पनवेलमध्ये एका नागरिकाबरोबर चारचाकी गाडी विकण्याचा करार केला. त्यानुसार या नागरिकाने नागरे याला १ लाख ५५ हजार रुपयांपैकी १ लाख ३० हजार रुपये दिले होते. मात्र, त्याने गाडी दिली नाही. त्यांनी पैशांची मागणी केल्यावर तो पळून पुण्यात लपून रहात होता. पनवेलमधील नागरिकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी शोध घेतला.

गुन्हे शाखेकडे संपर्क साधला. सोमवारी सकाळी पोलीस सिद्धेश्वर नागरे रहात असलेल्या वाघोलीतील श्री साई बिल्डिंगमध्ये गेले.
तेव्हा नागरे याने आपण एपीआय असल्याची बतावणी केली. पोलिसांनी तुमची नेमणूक कोठे आहे. तुमचे आयकार्ड दाखवा,
असे विचारले असता तो पोलिसांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांना त्याने धक्काबुककी केली. तू मला नाव पत्ता विचाणारा कोण,
मी अधिकारी असून सध्या एपीआय आहे, असे बोलून पोलिसांबरोबर अरेरावी व उद्धट वर्तन करुन सरकारी कामात अडथळा आणला.
त्याने गाडीवर पोलीस सिम्बॉल लावून बनावट नंबर प्लेट लावून फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Pune Police Arrest Bogus Police Officer FIR In Lonikand Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakhi Sawant Viral Video | पार्टीमध्ये अत्यंत शॉर्ट ड्रेस घालून राखी सावंतने दिल्या अशा पोज,
व्हायरल व्हिडिओनं वाढवला सोशल मीडियाचा पारा…

 

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

 

Priyanka Chopra Traditional Look | प्रियंका चोप्रानं पारंपारिक ड्रेस घालून दाखवला ग्लॅमरस अंदाज, फोटोतील देसी लूक पाहून नेटकरी गेले मोहून