Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विना परवाना देशी बनावटीची पिस्टल बाळगणाऱ्या (Pune Crime) सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या (Pune Police) मार्केट यार्ड पोलिसांनी (Market Yard police) सापळा रचून अटक (Arrest) केली. त्याच्याकडून एक पिस्टल (pistol) आणि एक जिवंत काडतूस (cartridge) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई (Pune Crime) सोमवारी (दि.4) आंबेडकर नगर वसाहत गल्ली नं.14 जवळील सार्वजनिक शौचालयाच्या मागे करण्यात आली.

निलेशकुमार ओंकारनाथ मौर्या (वय-24 रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील पोलीस कर्मचारी स्वप्नील कदम (Swapnil Kadam) यांना मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर वसाहतीमधील
सार्वजनीक शौचालयाच्या मागे एका तरुणाकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पंचासमक्ष अंगझडती घेतली.
त्यावेळी त्याच्या कमरेला देशी बनावटीची पिस्टल आणि एक जीवंत काडतूस आढळून आले.
आरोपी विरोधात मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) गुन्हा दाखल करुन अटक केली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan), परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त गलांडे (ACP Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे (Senior Police Inspector A.V. Deshpande),
पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे (Savita Dhamdhere) यांच्या सूचनेनुसार, तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम (PSI Amol Kadam),
महिला पोलीस उपनिरीक्षक गिरी, पोलीस हवालदार पवार, जाधव, कदम, यादव, शेख, घुले, भिलारे, जाधव, चव्हाण, औंधकर, कुंभार, दिवट यांच्या पथकाने केली. (Pune Crime)

 

Web Title : Pune Crime | Pune police arrest criminal with pistol

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Anti Corruption | 70 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह खासगी इसमावर FIR

Essential Tests For Women | 30 वर्षानंतर महिलांनी अवश्य केल्या पाहिजेत ‘या’ 5 टेस्ट; जाणून घ्या

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया