Pune Crime | पुण्यातील नागरिकांना कोट्यावधीचा ‘चुना’ लावणाऱ्या डॉ. कापगते, पत्नी आशा कापगतेला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर्स मार्केटमधून (Stock Market) चांगला परतावा (Return) देतो असे आमिष दाखवून पुण्यातील नागरिकांना कोट्यावधीचा (Pune Crime) चुना लावणाऱ्या (Cheating) भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) साकोलीच्या (Sakoli) कापगते दांपत्याला पुणे पोलिसांनी रायपुर (Raipur) येथून ताब्यात घेतले. डॉ. नाशिक कापगते (Dr. Nashik Kapgate) व त्याची पत्नी आशा कापगते (Asha Kapgate) असे या बंटी-बबलीच्या जोडीला पुणे पोलिसांनी (Pune Police) रायपुर येथून शुक्रवारी (दि.10) अटक केली.

 

हिंदी सिनेमातील ‘बंटी-बबली’ (Bunty-Bubbly) या जोडीने अनेकांना ज्या प्रकारे गंडवून फसविण्याचा प्रकार चालविला होता. प्रत्यक्ष तशाच प्रकारे शेअर्स मार्केटमध्ये चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवत या जोडीने आधी साकोली व त्यानंतर पुण्यातील (Pune Crime) अनेकांना कोट्यावधीचा चुना लावला. फरार झालेल्या साकोली तालुक्यातील या जोडीला पुणे पोलिसांनी शुक्रवारी रायपूर येथून अटक केली.

 

या जोडीने पुणे येथे जाण्यापूर्वी साकोली परिसरातील अनेकांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांनी गंडविल्यानंतर फरार झाले होते.
त्यानंतर त्यांनी आपले बस्तान पुणे शहरात मांडले. 2017 पासून पुणेकरांना शेअर्स मार्केटमध्ये दामदुप्पट परतावा देतो म्हणून फसवणुकीचा धंदा सुरु केला.
पुण्यात फसलेल्या गुंतवणूकदारांनी (Investors) फसवणुकीची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) दाखल केली होती.
मागील नऊ महिन्यापासून पुणे पोलीस या जोडीच्या मागावर होते.

डॉ. नाशिक कापगते याने 2017 पूर्वी साकोली परिसरातील अनेक जणांना अधिक परताव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपये गोळा केले.
सुरुवातीला नियमितपणे परतावा दिल्यामुळे लोकांचा विश्वास बसला. नंतर पुराव्यांअभावी तक्रारदाराच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नव्हती.
2017 मध्ये साकोली पोलीस ठाण्यात काही लोक फसवणुकीची तक्रार घेऊन गेले होते.
परंतु पुरावे नसल्याने तक्रारी दाखल झाल्या नाहीत. चेक बाऊन्सचे (Check Bounce)
प्रकरण गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंतर्गत येत नसल्याने सरळ कोर्टात गेले.
तेथून संबंधित व्यक्तीच्या पत्त्यावर अनेकदा नोटीस पाठवण्यात आली.
मात्र, डॉ. नाशिक कापगते पत्त्यावर राहत नसल्याने नोटीस कोणीही न स्विकारल्याने काही वर्षानंतर कोर्टाने हे प्रकरण खारीज केले होते.

 

Web Title :- Pune Crime | Pune police arrest dr nashik Kapgate and his wife asha in cheating fraud case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UPI Credit Card Linking | RBI च्या मंजूरीनंतर ‘या’ बँकांच्या क्रेडिट कार्डने होईल यूपीआय पेमेंट, असे करा लिंक

 

Pune PMC School News | महापालिकेच्या शाळा 15 जूनपासून सुरू होणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त विलास कानडे

 

MIM Imtiyaz Jaleel On BJP Nupur Sharma | ‘नुपूर शर्माला फाशी द्या’ – खा. इम्तियाज जलील यांची केंद्र सरकारकडे मागणी