Pune Crime | महाराष्ट्रासह देशभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी ज्येष्ठ महिलांना पेढ्यातून गूंगीचे औषध देऊन लुटणार्‍या झारखंडच्या पिंकी परियालला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | महाराष्ट्रासह देशभरात धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जेष्ठ महिलांना पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या झारखंडच्या एका कुविख्यात महिलेला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली. सीसीटीव्हीच्या (CCTV) मदतीने तिला अटक (Crime Arrest) केली आहे.

पिंकी परियाल (वय 34, रा. मूळ, झारखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरात जेष्ठ महिलांना गुंगी येणारी औषधे देऊन त्यांच्या गळ्यातील सोन साखळी किंवा मंगळसूत्र चोरून नेल्याचे घटना घडल्या आहेत. मध्यवस्तीत फुटपाथवर बसलेल्या एका 72 वर्षीय जेष्ठ महिलेला महिन्याला 2 हजार रुपये मिळवून देऊ असे म्हणत रिक्षातून स्वारगेट (swargate) भागात नेले होते. येथे आल्यानंतर संबंधित महिलेने त्यांना खाण्याच्या पदार्थात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. महिला बेशुद्ध होताच आरोपी महिलेने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याची चैन आणि रोकड असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (faraskhana police station) अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत फरासखाना पोलीस (faraskhana police) सीसीटीव्ही (CCTV) पडताळत होते.

दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी करण्यात येत होती.
त्यात एका ठिकाणी ही महिला आढळून आली होती. त्यानंतर तिची माहिती काढली गेली.
त्यावेळी ती राज्यासह देशभरात गुन्हे करत असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर सांगली तसेच शिर्डीत (shirdi) तिच्यावर अश्याच प्रकारे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. पण, ती सापडत नव्हती.
फरासखाना पोलीस शोध घेत असताना पोलीस अंमलदार मेहबूब मोकाशी यांना गुप्त माहिती मिळाली की ती पुणे स्टेशन (Pune Railway Station) परिसरात आली आहे. त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून पकडले.
तर तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा केला असल्याचे कबूल केले. त्यानुसार तिला अटक करण्यात आली आहे.
तिने राज्यासह देशभरात गुन्हे केले असल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

देव दर्शनासाठी ती मंदिरात येत असत.
त्याठिकाणी एकट्या असलेल्या जेष्ठ महिलांना हेरत. त्यांच्यासोबत गप्पा मारत बसत. त्यानंतर त्यांना गोडबोलून आमिष दाखवत.
त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल असे सांगत आणि त्यांना प्रवासात पेढ्यातून व खाद्य पदार्थ यामधून गुंगी येणारे औषध देत.
महिला बेशुद्ध होताच त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेत असत, असे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta), अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (additional commissioner of police dr. sanjay shinde),पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे (Deputy Commissioner of Police Priyanka Narnaware) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (assistant commissioner of police satish govekar),पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (senior police inspector rajendra landge),पोलीस निरीक्षक राजेश तटकरे (Police Inspector Rajesh Tatkare),सहायक निरीक्षक मनोज अभंग,कर्मचारी अभिनय चौधरी,सयाजी चव्हाण,सचिन सरपाले, आकाश वाल्मिकी,वैभव स्वामी,शरद वाकसे,मयूर भोकरे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune Crime | Pune police arrest Pinki Pariyal of Jharkhand for robbing senior women at religious places across the country including Maharashtra

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू