Pune Crime | पुण्यातील 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक; पोलिसांनी 12 तासात मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

पुणे : Pune Crime | बिबवेवाडीत (Bibvewadi) एकतर्फी प्रेमातून १४ वर्षाच्या क्षितिजा अनंत व्यवहारे (kshitija anant vyavhare) हिच्या मानेवर वार करुन हत्या करणार्‍या ऋषिकेश ऊर्फ शुभम बाजीराव भागवत (Rishikesh alias Shubham Bajirao Bhagwat) (वय २१, रा. सुखसागर नगर) याच्यासह तिघांना पुणे पोलिसांनी रात्रीत अटक (Pune Crime) केली आहे.

 

 

 

 

अल्पवयीन मुलीचा खून करुन पळून गेलेल्या चार संशयित आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी (pune Police)अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी सांगितले. शुभम भागवत हा क्षितिजा व्यवहारे हिचा नातेवाईक आहे. तो सुखसागरनगरला मावशीकडे राहून मिळेल ती कामे करत होता. तो क्षितिजा हिला गेल्या दीड वर्षांपासून त्रास देत होता. ही गोष्ट क्षितिजाच्या पालकांना समजल्यावर त्यांनी शुभम याला समज दिली होती. त्यानंतर तो चिंचवडला रहायला गेला होता. त्यानंतर काल सायंकाळी तो दोन मित्रांना घेऊन यश लॉन्स (Yash Lawns) येथील मैदानावर आला. त्याने क्षितिजाला बाजूला बोलाविले. तिने तू येथे काल आलास असे विचारल्यावर त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्याच्या साथीदाराने तिच्या पायावर वार (Pune Crime) केला. शुभम याने तिच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. तिच्या मैत्रिणी धावत तेथे आल्यावर त्यांनी खेळण्यातील पिस्तुलाने त्यांना धाक दाखवत हत्यारे तेथेच टाकून ते पळून गेले होते.

या प्रकारानंतर तिघेही जवळच्या झुडपात रात्रभर लपून बसले होते. बिबवेवाडी पोलिसांनी त्यांना पहाटे या झाडाझुडपातून शोधून शुभमसह तिघांना पकडले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta) हे आज सकाळी घटनास्थळी भेट देणार असून त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याला (Bibvewadi Police Station) भेट देणार आहेत.

हे देखील वाचा

MNS-BJP Alliance | मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याने घेतली फडणवीसांची बंगल्यावर जाऊन भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये होणार मोठा बदल, लवकरच येणार ‘हे’ नवं फिचर

High Court | हॉटेलच्या खोलीत लग्न, जोडप्याने भांड्यात आग पेटवून केली ’सप्तपदी’; हायकोर्टने म्हटले – ‘विवाह मान्य नाही, 25000 दंड’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Pune police arrest three in 14 years old girl murder of bibvewadi yash lawns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update