Pune Crime | पुण्यातील हॉस्पिटलमधून डोळे तपासणी मशीन चोरी करणारी ‘दुकली’ गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉस्पिटलचे कुलूप तोडून डोळे तपासणीचे महागडे मशीन (Eye check machine) चोरुन नेल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यातील (Pune Crime) श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये (Sri Sainath Hospital) उघडकीस आली होती. या गुन्ह्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police station) दोघांना अटक (Arrest) करुन 2 लाख 75 हजार रुपये किमतीची मशीन जप्त केली आहे.

सुरेश कानदास वैष्णव (वय-30 रा. लेदरमेल ता. बिनमाल, राजस्थान), प्रकाश गौराराम माली (वय-31 रा. सिद्धीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, पुणे, मुळ रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत डॉ. संभाजी किसन मांगडे Dr. Sambhaji Kisan Mangde (रा. धनकवडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे त्रिमुर्ती चौकात श्री साईनाथ हॉस्पिटल आहे.
8 सप्टेंबर रोजी रात्री हॉस्पिटल बंद असताना आरोपींनी कुलूप तोडून हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला.
हॉस्पिटलमध्ये डोळे तपासणी करण्याची महागडी मशिन चोरुन नेली.
9 सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास मशीन चोरीला गेल्याचे समोर आले.
या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक करुन त्यांच्याकडून मशीन जप्त केली आहे.
आरोपी हे चेश्मे बनवण्याचे काम करत असून त्यांनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar),
पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता यादव (Sangita Yadav),
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Vijay Puranik)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे (PSI Nitin Shinde),
अंकुश कर्चे, पोलीस अंमलदार रविंद्र भोसले, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, शिवदत्त गायकवाड, आशिष गायकवाड, विक्रम सावंत, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता (PSI Dhiraj Gupta) करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | pune police arrest two criminals who stole an eye examination machine from a hospital in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Modi’s Birthday | पीएम मोदींचा वाढदिवस ! रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे स्टेशनवर मुलांना वाटले चॉकलेट, प्लेटफार्मवर चालवली सफाई मशीन

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,410 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलतेंना बळजबरीने दिली 50000 ची ‘लाच’, दौंडमधील दत्तात्रय पिंगळे आणि मांजरीतील अमित कांदेला ACB कडून अटक