Pune Crime | पुणे पोलिसांकडून वाळू व्यावसायिक संतोष जगताप खून प्रकरणात दोघांना अटक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) लोणी काळभोरमध्ये दोन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन गँगमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. या घटने संतोष जगताप याचा खून (Santosh Jagtap murder case) झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. आर्थिक कारणामुळे खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु या खुनामागे आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड कोण आहे, याचा सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पवन गोरख मिसाळ Pawan Gorakh Misal (वय-29), महादेव बाळासाहेब आदलिंगे Mahadev Balasaheb Adalinge (वय-26 दोघेही रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे (Pune Crime) आहेत. स्वागत खैरे व त्याच्या साथीदारांनी संतोष जगतापवर गोळ्या घालून त्याचा खून केला. तर खैरे हा जगतापच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात ठार झाला. दोघांविरुद्धही लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात (Lonikalbhor police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना इंदापूर (Indapur) येथून अटक केली.

खैरे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरोधात खुन, खुनाच्या प्रत्नासह गंभीर गुन्हे दाखल होते. तर अटक केलेल्या मिसाळविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे व इतर गंभीर गुन्हे दाखल आहे. अटक करण्यात आलेला आदलिंगे हा देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आरोपींकडे सखोल चौकशी करत असून त्यांच्याकडून बरीच माहिती मिळेल, असे गुप्ता यांनी सांगितले.

https://youtu.be/xbq7akKrJk4

संतोष जगताप खुनातील आरोपी

संतोष जगताप याची स्वत:ची टोळी होती. 2011 मध्ये वाळु उपशाच्या कारणावरुन दौंड येथील सख्ख्या चुलत भावांचा खुन झाला होता.
या गुन्ह्यात संतोष जगताप याच्यासह 35 जणांचा समावेश होता. तसेच 2016 मधील खुनाच्या घटनेत देखील संतोषचा सहभाग होता.
त्यामुळे या खुनाच्या घटनेला वेगवेगळी कारणे असल्याचे अतिरीक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale)
यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge),
युनिट – 6 चे पोलिस निरीक्षक गणेश माने (PI Ganesh Mane) आणि त्यांचे इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune Crime | Pune police arrest two in sand trader Santosh Jagtap murder case of loni kalbhor police station (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 63 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

MP Sanjay Patil | ‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’, हर्षवर्धन पाटलांनंतर ‘या’ पाटलांचे वक्तव्य

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 103 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी