Pune Crime | पुण्यातील नामांकित सराफांना गंडा, महिला CCTV मध्ये कैद; पोलिसांकडून अटक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला हातचलाखीने गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी (Hadapsar police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे तपास करुन महिलेला अटक (Arrest) केली आहे. महिलेकडे करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुनम परमेश्वर देवकर (Poonam Parmeshwar Deokar) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून चोरी (Pune Crime) केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

आरोपी महिलेने पुण्यातील चंदुकाका सराफ अँड सन्स (Chandukaka Saraf & Sons), पु.ना. गाडगीळ (P.N. Gadgil) या नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात (jeweller’s shop) हातचलाखीने चोरी (Theft) केल्याचे उघड झाले आहे. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी (Gold ring) दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी ठेवत असे.

 

अशी करत होती चोरी

महिला ही सोन्याची अंगठी पाहण्यास मागून, ती दाखवताना हातचलाखीने खरी सोन्याची अंगठी घेऊन त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात असल्याचे अनेक ठिकाणच्या फुटेजमध्ये दिसून आले. हडपसर पोलिसांनी CCTV कॅमेरे तपासून या संशयित महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पद्धत याची सखोल माहिती घेऊन त्याद्वारे मगरपट्टा हडपसर ते बिबवेवाडी पर्यंतचे अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहून ही महिला बिबवेवाडीपर्यंत (Bibvewadi) गेल्याचे दिसून आले.

 

 

 

 

ज्वेलर्सच्या दुकानात सेल्समन

आरोपी महिला 2005-06 या कालावधीत अष्टेकर ज्वेलर्स (Ashtekar Jewelers), लक्ष्मी रोड (Laxmi Road) या ठिकाणी सेल्समन (Salesman) म्हणून काम करत होती. या ठिकाणी काम करत असताना, चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेस सराफी दुकानातील कामाचा अनुभव असल्याने सोन्याचे दागिन्यावर स्टिकर कसे लावायचे हे तिला (Pune Crime) माहित होते.

 

मोबाईलखाली लपवत होती अंगठी

आरोपी महिला दुकानात दागिने पाहण्यास गेल्यानंतर सोन्याच्या अंगठ्या पाहण्याचा बहाणा करत होती. त्या दरम्यान कधी पाणी व चहाची मागणी करुन सेल्समनचे लक्ष विचलीत करुन आणखी सोन्याच्या अंगठ्या दाखवण्यास सांगून मुळ सोन्याची अंगठी तिचे डाव्या हातातील मोबाइल खाली लपवून ठेवत होती. त्यानंतर तिच्याकडे असलेली बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापुर्वीचे ठिकाणाहून चोरुन आणलेले सोन्याचे अंगठीचे लेबल लावून ती, सोन्याचे अंगठीचे ट्रेमध्ये ठेवत असे. त्यामुळे तिची हातचलाखील सेल्समनच्या लक्षात येत नव्हती.

 

चोरीच्या गुन्ह्यांची कबुली

काही दिवसांनंतर दागिन्याची पाहणी करत असताना घडलेला प्रकार हा
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उघडकीस आल्यानंतर सारफी व्यावसायिकांच्या लक्षात येत होते.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन महिलेला अटक केली आहे.
आरोपी महिलेने इतरही गुन्हे कबुल केले आहेत.

 

Web Title :- Pune Crime | pune police arrest woman in case of theft from reputed jewelers watch cctv hadapsar police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा