Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांकडून अटक, पिस्टल व 2 काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard police) अटक केली आहे. ही कारवाई (Pune Crime) बैलबाजार समोरील सार्वजनिक शौचालयाच्या मागे मंगळवारी (दि.7) करण्यात आली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्टल आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहे. सुरज राकेश शुक्ला Suraj Shukla (वय-19 रा. धायरी गारमळा, धायरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील (Bundgarden Police Station) तपास पथकाचे कर्मचारी अनिस शेख (Anis Sheikh) व संदिप घुले (Sandeep Ghule) यांना बातमीदाराकडून माहिती समजली की, मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या (Marketyard Police Station) हद्दीतील बैलबाजार येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे एक तरुण उभारला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. ही माहिती मार्केटयार्ड पोलस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. व्ही. देशपांडे (Senior Police Inspector A.V. Deshpande) आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे (Senior Police Inspector Savita Dhamdhere) यांना कळवण्यात आली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने आंबेडकरनगर येथील बैलबाजार परिसरात सापळा रचून सुरज शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला पिस्टल व दोन काडतुसे सापडली. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करुन त्याच्याकडे सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने हे पिस्टल माझेच असल्याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम (PSI Amol Kadam) करीत आहेत.

 

 

ही कारवाई पुर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan),
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांच्या सुचनेप्रमाणे
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, पोलीस हवालदार हिरवळे, किरण जाधव,
पोलीस अंमलदार संदिप घुले, स्वप्नील कदम, आशिष यादव, प्रशांत मुसळे, विक्रम पाटील, अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune police arrested a youth carrying a pistol and seized a pistol and two cartridges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Earn Money | फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त कमाई देतात ‘हे’ ऑपशन्स, जाणून घ्या कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक

T-20 World Cup | ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा ! संघात महत्त्वाचे बदल, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

Pune Municipal Corporation | पालिकेच्या अर्थव्यवस्थेवर घाव अन् भाजपचा रडीचा डाव, राष्ट्रवादीचा घणाघात