Pune Crime | पुणे पोलिसांकडून ‘कालीचरण महाराज’ला अटक, पथक रायपूरहून पुण्याकडे रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला (Kalicharan Maharaj) छत्तीसगड पोलिसांनी अटक केली होती. पुणे पोलिसांनी (Pune Police) कालीचरण महाराजाला रायपूर (Raipur) मधून अटक केली असून न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन हे पथक पुण्याकडे रवाना झाले आहे. (Pune Crime)

 

पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये कालीचरण महाराजाला अटक (Pune Crime) करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी ‘पोलीसनामा ऑनलाइन’ सोबत बोलताना दिली आहे.

महात्मा गांधी यांच्या विरोधात धर्मसंसदेमध्ये आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद देशभर उमटले होते. कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील करण्यात आली. रायपूर पोलिसांनी (Raipur Police) त्याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलीस कोठडी घेण्यात आली होती. कालीचरण महाराज विरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये कालीचरण महाराज पुणे पोलिसांना हवा होता. समाज माध्यमावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे.

रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजाला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तिकडे धाव घेतली. न्यायालयाकडे कालीचरण महाराजाचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांची विनंती मान्य करून कालीचरण महाराजाचा ताबा पुणे पोलिसांकडे दिला आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलीस पुण्याकडे रवाना झाल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. त्याला पुणे न्यायालयामध्ये (Pune Court) हजर केले जाणार आहे.

Web Title : Pune Crime | Pune Police arrested kalicharan maharaj from raipur police team leaves for pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी