Pune Crime | मैत्रिणीबरोबरचे ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! 42 वर्षीय तरूणाला ब्लॅकमेल करणारा ‘मिथुन’ पोलिसांच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | मैत्रिणीबरोबरचे ‘ते व्हिडिओ, फोटो घरच्यांना पाठवून सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन 42 वर्षीय तरुणला ब्लॅकमेल करणार्‍या एकाला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक (Pune Crime) केली आहे.

मिथुन मोहन गायकवाड Mithun Mohan Gaikwad (वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार करण खुडे (रा. लोणंद, नातेपुते, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी कर्वेनगरमधील एका ४२ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा बिल्डिंग मटेरियल पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना २० मे रोजी एक फोन आला.
त्यावरुन बोलणार्‍याने तुझे व तुझ्या मैत्रिणीचे फोटो व व्हिडिओ आमच्याकडे आहेत.
ते घरांच्याना पाठवितो तसेच सोशल मिडियावर व्हायरल करुन समाजात तुझी बदनामी करतो, अशी भिती घातली. ते करु नये, म्हणून त्याच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
भितीपोटी फिर्यादीने आतापर्यंत २ लाख ६० हजार रुपये त्यांना दिले.
त्यासाठी त्याने आपले वडिलांची कारही विकली. तरीही त्यांचे धमकी देणे थांबत नव्हते.
शेवटी त्यांनी खंडणी विरोधी पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली.
पोलिसांच्या सांगण्यावरुन फिर्यादीने त्यांना आणखी १ लाख रुपये देण्यासाठी तयारी दर्शविली.
पैसे घेण्यासाठी दगडुशेठ गणपती मंदिराजवळील आईस्क्रीम पार्लरसमोर शुक्रवारी बोलावले.
फिर्यादीकडून १ लाख रुपये घेताना मिथुन गायकवाड याला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa) अधिक तपास करीत आहेत़.

 

Web Title : Pune Crime | pune police arrested Mithun Mohan Gaikwad of solapur in blackmailing case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ujjwala Yojana 2.0 | उज्ज्वला योजनेत अर्ज करण्यासाठी काय-काय आहे आवश्यक, ‘या’ कागदपत्रांशिवाय घेऊ शकत नाही मोफत LPG सिलेंडर

Pune News | ‘सिटी कॉर्पोरेशन’चे MD अनिरूध्द देशपांडे यांना अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे ‘ग्रीनटेक लिडिंग डायरेक्टर पुरस्कार 2021’ प्रदान

Indian Railways | Train ने रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी खुशखबर, Special Train मध्ये चालणार आता ‘हे’ तिकिट; जाणून घ्या