Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन जबरी चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलीस असल्याची बतावणी करुन मोबाईल, रोख रक्कम आणि गाडी चोरून नेणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) अवघ्या दोन तासात अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार मोबाईल, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरेलली दुचाकी असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

श्रीकांत भारत कदम (वय-32 रा. पांडवनगर पोलीस चौकीजवळ, पुणे), सुरज राजु धोत्रे (वय-32 रा. वडारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी ही कारवाई वडारवाडी येथील शनी मंदिराजवळ रविवारी (दि.18) केली. याबाबत रक्षाराम बचराज वर्मा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 392, 170, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश भिवरे (ASI Avinash Bhiware) यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यातील दोन आरोपी वडारवाडी येथील शनी मंदिराजवळ उभे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील चार मोबाईल, रोख रक्कम, आधारकार्ड आणि गुन्ह्यात वापरेलली दुचाकी असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व (अति. कार्य़भार पश्चिम प्रादेशिक विभाग) रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त सन्दीप सिंह गिल्ल (DCP Sandeep Singh Gill),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने
(Senior Police Inspector Arvind Mane) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड
(Police Inspector Vikram Goud), सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे,
पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे, पोलीस अंमलदार अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी, बशीर सय्यद,
रणजित फडतरे, सुरेंद्र साबळे, सतीश खुरंगे, आगेश चलवादी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune police arrested two people who committed theft by pretending to be policemen

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार