Pune Crime | व्यावसायिकाचे अपहरण करुन दीड लाखांची खंडणी उकळणार्‍या दोघांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime | कार रिपेरिंग (Car Repairing) बहाणा करून एका व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागीतली. त्यापैकी दीड लाख रुपयांची खंडणी (Pune Crime) उकळणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

राहुल मोताळे Rahul Motale (वय 21) आणि सुरज जांभळे Suraj Jambhale (वय 18) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत केसनंद येथील एका 36 वर्षाच्या व्यावसायिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार केसनंद (Kesnand) येथील आण्णाचा ढाबा येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोताळे हा फिर्यादी यांच्या तोंड ओळखीचा आहे. त्याने फिर्यादी यांना त्यांची शेवरेलेट क्रूझ कार रिपेरिंग करण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. ते तेथे पोहचल्यावर इतर दोघांनी त्यांच्या डोळयावर पट्टी बांधून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये ढकलून पळवून नेले. सुटका करण्यासाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही बाब फिर्यादी यांनी त्यांच्या भावाला सांगितली. तडजोडीअंती दीड लाख रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार फिर्यादीची पत्नी व भाऊ यांनी ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
दरम्यान, आरोपींनी एका ठिकाणी दीड लाख रुपये ठेवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्या भावाने दीड लाख रुपये ठेवले.
त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांना वाडेबोल्हाईच्या कमानीच्या पाठीमागे सोडले.
पोलिसांना व नातेवाईकांना माहिती दिली तर त्यांचे मुलीला पळवून नेईल, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांना सोडून दिल्याचे समजल्यावर पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत पळून जाणार्‍या तिघांना इंदापूर येथून ताब्यात घेतले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune police arrested two people who kidnapped a businessman and extorted a ransom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा