Pune Crime | बड्या शासकीय अधिकार्‍याविरुद्ध विनयभंगाची तक्रार न देण्यासाठी 3 लाखांची खंडणी मागणार्‍या 2 महिला ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शासकीय अधिकार्‍याविरोधात (Government Officer) विनयभंगाची तक्रार (molestation case) देण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 2 लाख रुपयांची खंडणी (Ransom) घेताना तरुणीसह दोघांना सापळा रचून पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे.

 

नेहा आयुब पठाण (वय 25, रा. कात्रज कोंढवा रोड – Katraj Kondhwa Road), श्रीमती मेहरुन आयुब पठाण (वय 52, रा. अकलुज, सोलापूर – Solapur) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी फिरोज पठाण (वय 30, रा. इंदापूर) आणि आयुब बशीर पठाण (वय 55) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

याप्रकरणी एका 56 वर्षाच्या शासकीय अधिकार्‍याने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शासकीय अधिकारी आहेत. त्यांना 16 डिसेंबर रोजी फिरोज पठाण यांचा नेहा पठाण यांच्या मोबाईलवरुन फोन करुन तुम्ही तिचा हात पकडला. तिचा मोबाईल घेतला व अश्लिल शब्द वापरले. अशी तक्रार पोलीस ठाण्यात देणार असल्याची धमकी दिली. जर पोलिसांकडे तक्रार दाखल करायची नसेल तर 3 लाख रुपयांची मागणी केली. त्यांना शुक्रवारी दुपारी १२ वाजता कॅम्पमधील एस जी एस मॉल (SGS Mall Pune) समोरील कॉफी हाऊसमध्ये पैसे घेऊन बोलावले.

 

या अधिकार्‍याने याची तक्रार पोलिसांकडे केली. ते पैसे देण्यासाठी या कॉफी हाऊसमध्ये गेले.
तेथे नेहा पठाण, मेहरुन पठाण आणि आयुब पठाण हे खंडणी घेण्यासाठी आले होते.
हॉटेलमधील CCTV मध्ये दिसेल, अशा पद्धतीने त्यांनी २ लाख रुपयांचे बंडल या आरोपींकडे दिले.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने छापा घालून दोन्ही महिलांना (Pune Crime) पकडले. सहायक पोलीस निरीक्षक राऊत (API Raut) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police arrested Two women for demanding Rs 3 lakh ransom for not filing a complaint of molestation against a government official

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा