Pune Crime | सैन्य दलाच्या वर्दीचा वापर करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार, पुणे पोलिसांनी अहमदनगर येथून ‘लखोबा लोखंडे’च्या आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनाना ऑनलाइन – शादी डॉट कॉमवर ओळख झालेल्या एका व्यक्तीने पुण्यातील (Pune Crime) एका तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने आपण भारतीय सैन्य दलात (Indian Army) असल्याचे भासवण्यासाठी सैन्याची वर्दी (Army Uniform) घालून तरुणीची फसवणूक (Cheating) केली. आरोपीने तरुणीला ड्रेस बदलण्याच्या बहाण्या लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) आरोपीला अहमदनगर येथून अटक (Arrest) केली आहे.

 

प्रशांत भाऊराव पाटील Prashant Bhaurao Patil (वय-31 रा. कुंपटगिरी, ता. खानापुर, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी भारतीय सैन्य दलातून भगोडा झाला असून तो 2018 पासून कर्तव्यावर रुजू झालेला नाही. आरोपीवर पुणे, अहमदनगर (Ahmednagar), लातुर (Latur) या ठिकाणी फसवणूकीचे 5 गुन्हे दाखल आहेत. आरोपीला 1 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेची शादी डॉट कॉमवर ओळख झाली. आरोपीने महिलेला समक्ष भेटू व आपल्या नविन आयुष्याविषयी चर्चा करु असे सांगून गुरुवारी (दि.18) दगडूशेठ गणपतीजवळ (Dagdusheth Ganpati) बोलावून घेतले. त्यावेळी त्याने आपण सच्चे देशभक्त असल्याचे भासवण्यासाठी भारतीय सैन्य दलाची वर्दी घातली होती. त्यानंतर स्वत:च्या चारचाकी गाडीत महिलेला बसवुन ड्रेस बदलण्याचा बहाणा करुन सिंहगड रोड येथील नवले ब्रिज (Navale Bridge) जवळील लॉजवर घेऊन गेला. या ठिकाणी त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार (Pune Crime) केले. यानंतर आपल्याला कर्तव्यावर जायचे असल्याचे सांगून महिलेला शनिवार वाडा (Shaniwar Wada) येथे सोडून आरोपी निघून गेला.

दरम्यान, महिलेने आरोपीला फोन केला असता त्याने तिचा फोन उचलला नाही.
महिलेला संशय आल्याने तिने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध सुरु केला असता आरोपी अहमदनगर येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने नगर येथून आरोपीला अटक केली.
अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पोर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे (Senior Police Inspector Devidas Gheware),
पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे (Police Inspector Pramod Waghmare)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले (API Chetan Thorbole),
पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ (PSI Kuldeep Sankapal), पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी,
सचिन माळवे, शंकर कुंभार, किशोर शिंदे, अविनाश कोंडे, अमेय रसाळ, सुहास मोरे, इंद्रजित जगताप,
अमोल पाटील, सागर भोसले, विकास बांदल, विकास पांडोळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune police arrests one from Ahmednagar in rape case which is registered in sinhagad road police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

8 राज्यांमध्ये आकाशातून होणार संकटाचा वर्षाव! IMD ने 1 डिसेंबरपर्यंत दिला जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या महाराष्ट्रा संदर्भातील पावसाचा अंदाज

Pune Crime | सिरम इन्स्टिट्युटच्या फर्नेस ऑईलमध्ये भेसळ करणार्‍या टँकरमालकासह तिघांवर गुन्हा दाखल

Shashikant Shinde | शिवेंद्रसिंहराजेंची राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंवर खरमरीत टीका, म्हणाले…